आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 4 वर्षे चालले या बॉलिवूड अभिनेत्रीचे करिअर, 26 वर्षापासून कुठे आहे कोणालाच नाही पत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1988 साली रिलीज झालेला सलमान खानचा डेब्यू चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' रिलीज होऊन 29 वर्षाचा काळ लोटला आहे. या चित्रपटातील ली़ड रोल फारुख शेख यांनी केला होता तर सलमानच्या अभिनेत्रीची भू्मिका रेणू आर्याने केली होती. आज रेणू कुठे आहे आणि काय करत आहे याबद्दल कोणाला माहिती नाही. 4 वर्षानंतरच संपले रेणुचे फिल्मी करिअर...
 
- रेणूचे करिअरही सलमानप्रमाणेच 1988 साली सुरु झाले होते. 
- रेणूने 'चांदनी', 'बंजारन' आणि 'जंगबाज' यांसारख्या चित्रपटात काम केले. यानंतर ती फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर पडली. 
- अनेक वर्षांअगोदर सलमानने त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याची भेट एकदा फ्लाईटमध्ये रेणूसोबत झाली होती. पण तिचा चेहरा इतका बदलला होता की, तिला ओळखणे मुश्किल झाले होते. 
- सलमानचे म्हणणे होते की, चित्रपटातील कोणीही त्यांना शोधायचा प्रयत्न केला नाही. 
- चित्रपटात लहान-सहान भूमिका करुन रेणूने थोडीफार प्रसिद्धी मिळवली.
- तसे पाहिले तर, रेणूने सलमान खान, रेखा, फारुख शेख यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते पण रेणूला सफलता मिळाली नाही. 
- तिचा शेवटचा चित्रपट 1991 साली 'बंजारन' नावाने आला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि गेल्या 26 वर्षापासून रेणू कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. 
 
या चित्रपटातून फेमस झाला सलमान खान..
- 'बीवी हो तो ऐसी' मध्ये सलमानने नकारात्मक भूमिका केली होती. 
- सलमानने 'मैने प्यार किया' चित्रपटातून यशाची चव चाखली. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रेणू आणि सलमानचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...