आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलीशान बंगल्यात राहतात हेमा मालिनी, आजही आहे त्यांच्याकडे 8 हजारांची मारुती कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठः अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असलेल्या हेमा मालिनी यांनी यूपी निवडणुकीसाठी प्रचार सुरु केला आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या हेमा मालिनी 1999 पासून भाजप पक्षात आहेत. बॉलिवूड स्टार्सजवळ किती प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे कोणत्या गाड्या आहेत, याविषयी जाणून घेण्यास सर्वसामान्य लोक नेहमीच उत्सुक असतात. म्हणूनच divyamarathi.com हेमा मालिनी आणि त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे एकुण किती संपत्ती आहेत, याची माहिती वाचकांना देत आहे. 

कोट्यवधी मालकीण आहेत हेमा मालिनी, आजही आहे 8 हजारांची मारुती कार...
- हेमा मालिनी देओल यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून मथुरेची उमेदवारी मिळाली होती.  
- या निवडणुकीच्या काळात त्यांना दाखल केलेल्या एफिडेविटमध्ये त्यांनी त्यांची 178 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
- एफिडेविटनुसार, हेमा मालिनी यांच्याकडे 5 कार आहेत, यापैकी तीन कार या त्यांचे पती धर्मेंद्र यांच्या नावाने रजिस्टर्ड आहेत. 
 
हेमा मालिनी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीचे डिटेल्स पुढीलप्रमाणे आहेत...  
मर्सडीज बेन्ज -33.6 लाख
टोयोटा इनोव्हा - 4.8 लाख
मारुती 800 - 8 हजार रुपये 
बाइक - 37 हजार

विनोद खन्ना यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या राजकारणात 
- हेमा मालिनी यांनी पहिल्यांदा 1999 साली बीजेपीकडून लोकसभा निवडणुकीत उतरलेले विनोद खन्ना यांच्यासाठी पंजाबमध्ये प्रचार केला होता. 
- फेब्रुवारी 2004 मध्ये त्यांनी अधिकृतरित्या भाजप पक्षात प्रवेश केला होता.  
- 2003 ते 2009 या काळात हेमा मालिनी या राज्यसभेच्या नॉमिनेटेड मेंबर होत्या. 
- त्यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नॉमिनेट केले होते. 
- मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या  जनरल सेक्रेटरी बनल्या. 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून त्यांना मथुरेची उमेदवारी मिळाली होती.  
- त्यांनी राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी यांना 3 लाख मतांनी हरवले होते.  

पुढील स्लाईड्सवर वाचा, किती आहे हेमा मालिनी यांची संपत्ती, किती कोटींचे आहेत त्यांच्याकडे दागिने... 
बातम्या आणखी आहेत...