आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनियां..'मध्ये झाल्या होत्या या 13 FUNNY MISTAKES

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज 52 वा वाढदिवस आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये शाहरुखने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मात्र 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाचे त्याच्या आयुष्यातील महत्त्व फार वेगळे आहे. या सिनेमातूनच तो रोमँटिक अॅक्टर म्हणून नावारुपास आला. 19 ऑक्टोबर 1995ला रिलीज झालेल्या या सिनेमाताल भारतीय सिनेसृष्टीत खास महत्व आहे. सिनेमाने शाहरुख खान आणि काजोल यांना सुपरस्टार बनवले. 4 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने तब्बल 302 कोटींचा गल्ला जमवला.

या रोमँटिक सिनेमाला प्रत्येक वयोगटातील लोक पसंत करतात. सिनेमाची गाणी, कथा, प्लॉट, कलाकार, त्यांचा अभिनय सर्वकाही उत्कृष्ट होते. परंतु तुम्हाला माहित आहे का? या सिनेमात अनेक चुका आहेत. 'डीडीएलजे' फुल ऑन एंटरटेनर सिनेमा आहे यात काहीच शंका नाहीये. दिग्दर्शक आदित्य चोप्राने सिनेमा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक एक सीन शूट करण्यासाठी सिनेमाची टीम बारकाईने त्याकडे लक्ष देते. परंतु चांगल्या गोष्टी करत असताना काही गोष्टीत चूका तशाच राहतात. अशाच काही चूका दिग्दर्शक आदित्य चोप्राकडून झाल्या आहेत.

जेव्हा शाहरुखच्या पायातील बूट होतात गायब...
या सीनमध्ये सिमरन (काजोल) राज (शाहरुख) पूलमध्ये ओढते. त्यावेळी शाहरुखने बुट घातलेले असतात. पुढच्या सीनमध्ये त्याच्या पायात बुट नसतात आणि तो अनवाणी पायाने पुलमध्ये जातो.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख खान-काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमातील असेच काही Blunders...
बातम्या आणखी आहेत...