आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bobby Darling To Get Married With Businessman Of Bhopal

बिझनेसमनसोबत लवकरच लग्नगाठीत अडकणार बॉबी डार्लिंग, मुंबईला ठोकणार रामराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः बॉलिवूड कलाकार बॉबी डार्लिंग (ट्रान्स वुमन) लवकरचट नवाबी शहर म्हणून ओळखल्या जाणा-या भोपाळची सून होणारेय. ती लवकरच येथील एका प्रसिद्ध बिझनेसमनसोबत लग्नगाठीत अडकणारेय. ही बातमी स्वतः बॉबी डार्लिंगने दिली आहे. ती आपल्या लग्नाच्या प्लानिंगसाठी दोन ते तीन दिवस भोपाळमध्येच होती. divyamarathi.com सोबत बातचित करताना तिने सांगितले, की ती लवकरच भोपाळची सूनबाई होणारेय. मात्र आपल्या भावी पतीचे नाव गुलदस्त्यातच ठेवले आहे.
नाव सांगू शकत नाही, मात्र भावी पती आडनाव शर्मा आहे
बॉबी डार्लिंग लवकरच भोपाळची सूनबाई होणारेय. इतकेच नाही तर लग्नानंतर मुंबईला कायमचा रामराम ठोकून भोपाळमध्ये स्थायिक होणार असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, माझ्या भावी पतीचे आडनाव शर्मा आहे. लग्नापूर्वी कोणत्याही वादात मी अडकू इच्छित नाही. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझे पतीसुद्धा लग्नापूर्वी आपले नाव गुप्त ठेऊ इच्छितात.
भावी पती बॉबीसाठी शिकतोय जेवण बनवणे...
बॉबीने सांगितले, माझे भावी पती उत्तम कूक आहेत. ते माझ्यासाठी खास कूकिंग क्लासमध्येही जात आहेत.
बिग बॉससह अनेक सिनेमांमध्ये केलंय काम
बॉबीचे खरे नाव पंकज शर्मा आहे. ती मुळची दिल्लीची आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर बॉबी नावाने तीफेमस झाली. बॉबीने वयाच्या 23 व्या वर्षीपर्यंत तब्बल 18 गे कॅरेक्टर पडद्यावर साकारले. यासाठी तिचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात ती सहभागी झाली होती. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
अनेकांसोबत होते अफेअर
बॉबी डार्लिंगचे अनेक लोकांसोबत अफेअर होते. काही महिन्यांपूर्वी ती अभिनेता अमित शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र महिन्याभरापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले.
पुढे पाहा, बॉबी डार्लिंगची छायाचित्रे...