आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेतील सोज्वळ बहू जेव्हा बनली Bold, या आयटम साँगने घातला होता धुमाकूळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अॅक्ट्रेस प्राची देसाई हिने मंगळवारी वाढदिवस साजरा केला आहे. पण प्राचीचा टीव्ही शो ते मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास यशस्वी ठरला आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कसम से' या मालिकेमुळे प्राची घराघरांत पोहोचली. तीन बहिणींवर आधारित या मालिकेत प्राचीने बानी हे पात्र साकारले होते. त्यानंतर तिने स्वतःला चित्रपटांसाठी तयार केले आणि रुपेरी पडद्यावरही यश संपादन केले. पण तिने स्वतःला कोणत्याही चौकटीतही अडकवून ठेवले नाही. एक व्हिलन चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले. या आयटम साँगची त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्याचे कारण म्हणजे या आयटम साँगमध्ये प्राचीचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. 'आवारी' असे बोल असलेल्या या आयटम साँगमघ्ये प्राचीचा ग्लॅमरस अंदाज तेव्हा पाहायला मिळाला होता. टीव्हीवरील सोज्वळ बहू ते बोल्ड आयटम गर्ल असे तिचे ट्रान्सफॉर्मेशन अनेकांना चकित करणारे होते. चला तर मग पाहुयात या गाण्यातील प्राचीचा ग्लॅमरस अंदाज.

आवारी गाण्यातील प्राचीचा बोल्ड लूक असलेले फोटोज पाहा, पुढील स्लाइड्सवर अखेरच्या स्लाइडवर गाण्याचा व्हिडीओ.. 
बातम्या आणखी आहेत...