आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Aditya Pancholi And His Cntroversies

B'day: पत्नी-मुले असतानाही 20 वर्षे लहान कंगना रनोटसोबत Live-Inमध्ये होता आदित्य पांचोली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - कंगना रनोटसोबत आदित्य पंचोली, उजवीकडे - पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत आदित्य पांचोली - Divya Marathi
डावीकडे - कंगना रनोटसोबत आदित्य पंचोली, उजवीकडे - पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत आदित्य पांचोली
मुंबई- आदित्य पांचोली बॉलिवूडचा असा एक अभिनेता आहे, जो आपल्या सिनेमांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असतो. वादांमुळे नेहमीच प्रसिद्धीझोतात राहणा-या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. 12 सप्टेंबर 1965 रोजी जन्मलेल्या आदित्यने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. फिल्ममेकर राजन पांचोली यांचा तो मुलगा असून त्याला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत.
आदित्यच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्याविषयी आणि तो कोणकोणत्या वादात अडकला, याविषयीची माहिती देतोय...
वयाने सहा वर्षे मोठ्या जरीनासोबत केले लग्न
आदित्यने फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवण्यापूर्वीच आपल्यापेक्षा वयाने सहा वर्षे मोठ्या असलेल्या जरीना वहाबसोबत सात फेरे घेतले होते. असे म्हटले जाते, की एका सिनेमाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती आणि बघताच क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या भेटीच्या केवळ वीस दिवसांतच दोघांनी लग्नही केले. लग्नानंतर आदित्यला इंडस्ट्रीत काम मिळायला सुरुवात झाली. तर जरीना गृहिणी बनली. आदित्य आणि जरीना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सूरजने अलीकडेच हीरो या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
कंगनाची झाली आदित्यच्या आयुष्यात एन्ट्री
लग्नाच्या काही वर्षांनी आदित्य आणि त्याच्यापेक्षा वयाने 20 वर्षे लहान असलेल्या कंगना रनोट यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. कंगना त्यावेळी सिनेसृष्टीत संघर्ष करत होती. तर आदित्य तिचा मेंटर होता. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले. याचा परिणाम आदित्यच्या वैवाहिक आयुष्यावर पडला. कंगनासोबत ब्रेक्रप झाल्यानंतर आदित्यने तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता, याची कबुली दिली होती. त्यामुळे आपल्या कौटुंबिक आयुष्यावर त्याचा परिणाम झाल्याचेही त्याने मान्य केले होते. आदित्यने काही दिवसांपूर्वी सांगितले होते, की तो लवकरच कंगना आणि त्याच्या नात्याचे रहस्य पुस्तकाच्या माध्यमातून उघड करणार आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप
आदित्यवर अभिनेत्री पूजा बेदीच्या 15 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचाही आरोप होता. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही आणि पूजासोबत असलेले अनेक वर्षांचे मैत्रीचे नाते संपुष्टात आले. आदित्यला सिनेसृष्टीत फारसे यश मिळू शकले नाही. मात्र आपल्या तापट स्वभावामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. कधी शेजा-याला मारहाण तर कधी डीजे बाऊंसरला धक्काबुक्की केल्याने आदित्य ब-याचदा तुरुंगातसुद्धा गेला आहे. याच वर्षी 'लाखों है यहाँ दिलवाले' या सिनेमाच्या सेटवर आदित्यने त्याचा सहअभिनेता विजय भाटियाला थापड मारल्याचे प्रकरण समोर आले होते. आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाच्या सेटवरसुद्धा आदित्ने क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याने संजय लीला भन्साळी यांनी त्याला सेटवरुन बाहेर काढले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आदित्यची त्याच्या कुटुंबासोबतची छायाचित्रे...