आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिलेत का अजय देवगणच्या आयुष्यातील हे 13 PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिनेता अजय देवगण त्याच्या आगामी 'शिवाय' या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. 2 एप्रिल 1969ला नवी दिल्लीमध्ये जन्मलेल्या अजय देवगणचे मूळ नाव विशाल वीरू देवगण आहे. प्रेमाने त्याला राजू म्हणून बोलावले जाते. अलीकडेच भारताचा चौथा सर्वात मोठा पद्मश्री पुरस्कार जिंकणारा अजय 24 वर्षांपासून इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे.

वयाच्या 16व्या वर्षी आला होता पहिला सिनेमा...
अजय देवगण 16 वर्षांचा असताना त्याला पहिला सिनेमा रिलीज झाला होता. 'प्यीर बहना' हा त्याचा पहिला सिनेमा होता. 1985मध्ये आलेल्या 'सी' सिनेमात अजयने मिथुन चक्रवर्ती यांच्या तरुणपणातील भूमिका साकारली होती.

वडील आहेत प्रसिध्द स्टंट कोरिओग्राफर...
अजय देवगणचे वडील वीरू देवगण प्रसिध्द स्टंट कोरिओग्राफर आहेत आणि त्याची आई वीणा निर्माती. अजयला एक भाऊ असून त्याचे अनिल देवगण आहे. त्याने 'राजू चाचा'सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. अजयच्या 'फूल और कांटे' सिनेमात वडील वीरू स्टंट आणि अॅक्शन कोरिओग्राफर होते. वीरू निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकसुध्दा होते. त्यांनी 1999मध्ये आलेला 'हिंदुस्तान की कसम' सिनेमा दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक म्हणून वीरू यांचा हा एकच सिनेमा आहे.

'हलचल'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी...
अजय देवगण आणि काजोल यांची लव्हस्टोरी 'हलचल' (1995) सिनेमाच्या सेटवर सुरु झाली होती. त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान अजय देवगणला शांत पाहून काजोल हैराण झाली होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते, 'तिला वाटायचे, की अशा को-अॅक्टरसोबत कसे काम करेल.' नंतर दोघांनी ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा’ आणि ‘यू मी और हम’सारख्या सिनेमांत एकत्र काम केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अजय देवगणचे Rare Photos, सोबतच वाचा फॅक्ट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...