आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : वडील जगदीप यांचा तिरस्कार करायचा जावेद जाफरी, जाणून घ्या रंजक Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेसृष्टीत विनोदवीर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता जावेद जाफरी आज (4 डिसेंबर) आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. जावेद जाफरी केवळ अभिनेता आणि कॉमेडियनच नाहीये, तर उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. याशिवाय जावेद जाफरीने सिंगर, कोरिओग्राफर, वीजे आणि जाहिरात निर्माता म्हणूनसुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

1985 मध्ये 'मेरी जंग' या सिनेमाद्वारे जावेदने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे जावेदला लोकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर जावेद अनेक हिट सिनेमांमध्ये झळकला. 'सलाम नमस्ते', 'ता रा रम पम', 'फायर', 'अर्थ', 'थ्री इडियट्स' या गाजलेल्या सिनेमांत जावेद झळकला.

 

जावेद जाफरी एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेते जगदीप जाफरी यांचा मुलगा आहे. वडील प्रसिद्ध अभिनेते असूनसुद्धा जावेदने त्यांच्या नावाचा वापर न करता फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या जावेदच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...