आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Riteish Deshmukh Spotted In New Hairstyle

\'छत्रपती शिवाजी\' फिल्मसाठी रितेशचा Look Change, वाढवतोय केस!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता रितेश देशमुखचा जुना आणि लेटेस्ट फोटो. - Divya Marathi
अभिनेता रितेश देशमुखचा जुना आणि लेटेस्ट फोटो.

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता रितेश देशमुख अलीकडेच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याचा लूक बघून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. याचे कारण म्हणजे रितेशची हेअरस्टाइल नेहमीपेक्षा खूप वेगळी होती. वरील छायाचित्रात तुम्ही रितेशच्या लूकमध्ये झालेला बदल बघू शकता. या फॅशन शोमध्येच नव्हे तर रितेश आता प्रत्येकठिकाणी लांब केसांतच दिसतोय. अभिनेत्री असिनची रिसेप्शन पार्टीमध्येही त्याचा असाच काहीसा लूक दिसला. शिवाय बुधवारी तो मुंबईतील वांद्रा परिसरातदेखील अशात हेअरस्टाइलमध्ये दिसला.
नेहमी बारीक केसांमध्ये दिसणा-या रितेश अचानक केस का वाढवतोय, हा प्रश्न नक्कीच त्याच्या चाहत्यांच्या मनात डोकावला असणार ना... रितेश आपला लूक का चेंज करतोय, यामागे आहे एक खास कारण. ते म्हणजे रितेश लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सिल्व्हर स्क्रिनवर घेऊन येणारेय. या सिनेमात रितेश स्वतः छत्रपती शिवाजींची भूमिका वठवणार असल्याचे समजते. या ऐतिहासिक व्यक्तिरेखेसाठी रितेश कदाचित केस वाढवत असावा, असे चित्र आहे.
रितेश देशमुखचे प्रॉडक्शन हाऊस ‘मुंबई फिल्म कंपनी’ ‘छत्रपती शिवाजी’ सिनेमाची निर्मिती करत असून जेनेलिया देशमुखला सिनेमाच्या निर्मितीची तर दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात जेनेलियाने ट्विट करुन या सिनेमाची घोषणा केली होती. अंदाजे 15 ते 20 कोटी या सिनेमाचे बजेट असल्याचे समजते आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच आजपर्यंत मराठीत बनलेला सगळ्यात बिग बजेट सिनेमा असणार आहे. हा सिनेमा मराठीतला भव्य सेट आणि VFXच्या मदतीने बनणारा सिनेमा असणार आहे. अर्थातच या सिनेमात रितेशनचा नवा अवतार त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा असेल, यात दुमत नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रितेशची न्यू हेअरस्टाइमधील लेटेस्ट छायाचित्रे...