आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानची जीभ घसरली, चाहत्यांसह सर्वपक्षीयांचा रोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आक्षेपार्ह वक्तव्य करून अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. या वक्तव्यावर त्याचे वडील सलीम खान यांनी माफी मागीतली असली तरी सलमानच्या माफीसाठी सर्वपक्षीय संघटना मात्र आक्रमक झाल्या आहेत.दरम्यान, महिलांविषयक राष्ट्रीय आयोगाने (एनसीडब्ल्यू) याबाबत सुअो मोटो दाखल करून घेतली आहे. सलमानने हे कृत्य जाणीवपूर्वक केले असून त्याने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, असे एनसीडब्ल्यूने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्त्यांनी सलमानच्या बांद्रा येथील निवासस्थानासमोर आंदोलन केले. शिवाय राजकीय पक्ष, सोशल मीडियाचे वापरकर्ते आणि महिला संघटनांनी तीव्र रोष व्यक्त करत माफीची मागणी केली आहे.

घईंचा सलमानला पाठिंबा : दिग्दर्शक सुभाष घई यांनी सलमानला याप्रकरणी पाठिंबा दिला आहे. सलमानच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. हे सर्व वाक्याचे इंग्रजी भाषांतर चुकीचे केल्यामुळे झाले, असे घई यांनी म्हटले आहे. भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी सलमानने माफी मागावी, असे म्हटले आहे.

निर्भयाच्या आईचा तीव्र रोष : सलमानच्या वक्तव्यामुळे आपण खूपच दुखावलो आहोत. त्यामुळे समाजावर परिणाम होतो. त्याने असे का म्हटले हे माहिती नाही, मात्र ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली सामूहिक बलात्कारपीडित निर्भयाच्या आईने दिली आहे. शिवसेनेने सलमानला चांगलेच धारेवर धरले असून त्याने "निष्ठुर' वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. तर सलमानवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

काय म्हणाला सलमान
"सुलतान'चे चित्रीकरण खूपच कठीण होते. १२० किलो वजनाच्या पैलवानाला १०-१० वेळा उचलून आपटावे लागायचे. त्यामुळे चित्रीकरण संपवून आल्यानंतर बलात्कार झालेल्या महिलेसारखी अवस्था व्हायची. कारण मी सरळ चालूच शकत नव्हतो.
बातम्या आणखी आहेत...