आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: हे आहेत संजय खान यांचे फॅमिली मेबर्स, पाहा कोण-कोण आहे कुटुंबात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः संजय खान यांचे कुटुंब) - Divya Marathi
(फोटोः संजय खान यांचे कुटुंब)
मुंबईः 'द सॉर्ड ऑफ टीपू सुल्तान' ही टीव्हीच्या इतिहासातील ती मालिका आहे, ज्यामुळे संजय खान चर्चेत आले होते. संजय खान यांनी अभिनयातून नाव कमावले. मात्र ही मालिका त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली. 1989 मध्ये आलेल्या या मालिकेत टीपू सुल्तानाची भूमिका साकारणारे अभिनेते संजय खान आज 75 वर्षांचे झाले आहेत.
संजय यांची दुसरी ओळख फिरोज खान आणि अकबर खान यांच्या भावाच्या रुपात आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. संजय खान यांनी 60 च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली. 'दोस्ती' (1964) या सिनेमाद्वारे त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. 60 आणि 70 च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. 'दस लाख', 'एक फूल दो माली', 'इंतकाम', 'उपासना', 'मेला', 'नागिन' 'सोना चांदी', 'काला धंधा गोरे लोग' हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत.

अभिनयानंतर संजय यांनी दिग्दर्शक, निर्माती आणि पटकथा लेखकाच्या रुपातही आपली ओळख निर्माण केली. 'महा काव्य महाभारत 1', 'जय हनुमान', 'द सॉर्ड ऑफ टीपू सुल्तान' या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
संजय खान यांचे कुटुंब
संजय खान यांचे लग्न जरीन खान यांच्यासोबत झाले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या चारही मुलांची लग्ने झाली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या संजय खान यांच्या कुटुंबीयांविषयी...