आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी पैसे नसल्याने रस्त्यावर झोपायचा शाहरुखचा 'डुप्लीकेट', आज 4 फ्लॅट, 3 कारचा आहे मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी कानपूर येथे झालेल्या कानपुर रत्न समारोहमध्ये आलेला ज्यूनिअर शाहरुख लोकांच्या उत्सुक्तेचा विषय बनला होता. बॉलीवुड स्टार किंग खान शाहरुख खानची अॅक्टींग करणाऱ्या राजू रहिकवार ने आमच्या प्रतिनीधीशी बोलताना त्याची जीवनयात्रा, संघर्षाचे दिवस याची पूर्ण माहिती दिली. मित्र म्हणायचे शाहरुखचा आहेस डुप्लीकेट...
 
मित्र म्हणायचे शाहरुखचा आहेस डुप्लीकेट...
महाराष्ट्रातील विदर्भाती बल्लारशाह येथे राहणारा  जेव्हा मित्रांसोबत शाहरुखचा दिवाना हा चित्रपट पाहायला गेला होता तेव्हा  त्याच्या सर्व मित्रांनी त्याला शाहरुखचा डुप्लीकेट म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर राजुने चित्रपटात काम करण्याचे ठरवले. राजू अभ्यासात साधारण होता. त्याने दहावीची परिक्षा 4 वेळेस दिली. अभ्यासाऐवजी त्याला बसमध्ये मित्रांसोबत फिरणे आणि मौजमजा करण्यास आवडत असे. जेव्हा त्याने त्याच्या घरी चित्रपटांत काम करणार असल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावले आणि गावातच त्याच्यासाठी दुकान उघडणार असल्याचे सांगितले. 
 
घरातून गेला पळून..
जेव्हा राजूच्या लग्नाबद्दल घरात चर्चा सुरु झाली तेव्हा राजूने त्याच्या भावाला चित्रपटांत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले तेव्हा त्याने त्यासाठी घर सोडावे लागेल असा सल्ला दिला. तेव्हा राजूने घर सोडले आणि नागपूरला निघून गेला. तेथे त्याने ओ.पी.सिंग यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, ऑर्केस्ट्रा तसेच ऑफिसबॉयचे केले काम...
बातम्या आणखी आहेत...