आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सारेगमप लिटील चॅम्प्स\'चा होस्ट आदित्य नारायणच्या घराचे INSIDE PICS, 16 भाषांमध्ये गातो गाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता, गायक, संगीतकार आणि होस्ट आदित्य नारायणचे घर मुंबईत असून तो त्याचे आईवडील आणि आजीसोबत राहतो. आदित्यला बालपणापासूनच गायन आणि अभिनयाची आवड आहे. 1995 साली आलेल्या रंगीला या सिनेमाद्वारे आदित्यने त्याच्या गायन आणि अभिनय करिअरची सुरुवात केली होती. प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा आदित्य मुलगा आहे. आदित्यचा 6 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला त्याच्या मुंबईतील घराची खास झलक दाखवत आहोत. आदित्यची आई नीता नारायण यांनी त्यांच्या या घराचे फोटोज आमच्यासोबत शेअर केले आहेत.  
 
- आदित्यचे वडील उदित नारायण यांनी 30 भाषांमध्ये 15 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
- आदित्यच्या आईचे नाव नीता नारायण असून त्या मुळच्या वेस्ट बंगालच्या आहेत. विशेष म्हणजे नीता नारायण यादेखील 15 भाषांमध्ये गाणी गातात. याशिवाय त्यांनी आतापर्यंत सहा भोजपुरी सिनेमांची निर्मितीदेखील केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या पतीसोबत स्टेज शो करत आहेत.  
- आदित्यचे शालेय शिक्षण उत्पल सांघवी स्कूल मुंबई येथून झाले. त्यानंतर मुंबईच्या मीठीबाई कॉलेजमधून त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
- आदित्यच्या करिअरची सुरुवात कल्याण विर्ज शाह यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आदित्यच्या चौथ्या वाढदिवसाला ते त्याला भेटले होते.
- त्यानंतर 1995 साली सुभाष घई यांनी आदित्यला एका कार्यक्रमात पाहिले होते. तेथून त्याच्या अभिनय करिअर सुरु झाले.  

2014 मध्ये बनवला होता स्वतःचा बँड...
- आदित्यने 2014 साली स्वतःचा बँड सुरु केला होता. त्याचे नाव आहे 'THE A TEAM'.
- आदित्यने आतापर्यंत 120 गाणी गायली आहेत. तोसुद्धा त्याच्या आईवडिलांप्रमाणे 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गातो.
- 'छोटा बच्चा जान के हमको' या गाण्यातून आदित्य प्रसिद्धीझोतात आला.
- वयाच्या 8 वर्षी आदित्य तीन सिनेमांत झळकला होता. रंगीला, परदेस आणि जब प्यार किसी से होता है या सिनेमात त्याने बालकलाकाराची भूमिका वठवली होती.
- सध्या आदित्य सारेगमप लिटील चॅम्प्सचे पर्व होस्ट करतोय. 

 आदित्यच्या घराचे आणि फॅमिली फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...