आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे जितेंद्र यांचा लाडका मुलगा तुषार, पाहा बालपणीपासून आतापर्यंतचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे पिता जितेंद्रसोबत तुषार, वरती कोल्ड्रिंक पिताना तुषार, खाली बहीण एकतासोबत बालपणी तुषार कपूर - Divya Marathi
डावीकडे पिता जितेंद्रसोबत तुषार, वरती कोल्ड्रिंक पिताना तुषार, खाली बहीण एकतासोबत बालपणी तुषार कपूर
एंटरटेन्मेंट डेस्क: अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर बाबा झाला आहे. मात्र अद्याप तुषारने लग्न झालेले नाहीये. सिंगल पॅरेंट बनण्यासाठी त्याने सेरोगेसीची मदत घेतली. त्याने मुलाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. तुषारच्या मुलाचा पहिला फोटो समोर आला आहे. त्यात लक्ष्य आजोबा जितेंद्रसोबत दिसत आहे. तुषारच्या सांगण्यानुसार, लक्ष्य हुबेहूब त्याच्यासारखा दिसतो. एकता कपूरच्या सांगण्यावरून लक्ष्यच्या नावात डबल S (Laksshya) वापरण्यात आले आहे. जितेंद्र यांच्या घरी चिमुकल्याच्या आगमनाचा आनंदनिमित्त आम्ही तुम्हाला आज तुषार कपूरचे बालपण दाखवत आहोत.
पहिल्या सिनेमासाठी मिळाला होता अवॉर्ड...
तुषारने करिअरच्या सुरुवातील 2001मध्ये करीना कपूरच्या अपोझिट 'मुझे कुछ कहना है' सिनेमात काम केले होते. या सिनेमासाठी तुषारला बेस्ट डेब्यू फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. मात्र, पुढील दोन वर्षांत रिलीज झालेले तुषारचे 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जीना सिर्फ मेरे लिए'
आणि 'कुछ तो है' सिनेमे फ्लॉप ठरले.
तुषार कपूर असा बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री झाली होती. परंतु पुढे चालून त्याच्या करिअरच्या आलेख घसरत गेला. कधीकाळी तुषारकडे होम प्रॉडक्शनशिवाय इतर सिनेमेसुध्दा नव्हते. या स्टार सनला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. सोलो रोल नाही परंतु वेगवेगळ्या छोट्या भूमिकांमधून स्वत:ला इंडस्ट्रीत टिकवून ठेवण्याचा संघर्ष तुषार आजही करतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तुषारच्या बालपणीपासून आतापर्यंतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...