आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असा दिसतो उदय चोप्रा, 4 वर्षांपासून रिलीज झाला नाही एकही चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मोहबब्तें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडेच अभिनेता इमरान हाश्मीच्या वांद्रास्थित घराबाहेर पडताना दिसला. यावेळी उदयचा लूक अतिशय बदलेला दिसला. यावेळी त्याचे वजनही बरेच वाढलेले दिसून आले. ब्लॅक कलरचा टी-शर्ट, जीन्स आणि कॅपमध्ये तो दिसला.  2013 मध्ये रिलीज झालेल्या 'धूम-3' या चित्रपटानंतर उदय मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. 
 
सहायक दिग्दर्शक म्हणून केली करिअरची सुरुवात..  
उदय चोप्रा 1991 साली रिलीज झालेल्या 'लम्हे' या चित्रपटातून सहायक दिग्दर्शकाच्या रुपात आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. काही चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर 2000 साली 'मोहब्बतें' या चित्रपटातून तो अभिनयाकडे वळला. त्यानंतर तो 'मेरे या की शादी है' (2002), 'धूम' (2004), 'नील अँड निक्की' (2005), 'धूम 2' (2006), 'धूम 3' (2013) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकला. पण अभिनय क्षेत्रात तो फारसा यशस्वी ठरला नाही.
 
2012 साली उदयने योमिक नावाने स्वतःची कंपनी सुरु केली. याशिवाय तो यशराज फिल्म्सचा मॅनेजरसुद्धा आहे. 2014 साली त्याने 'ग्रेस ऑफ मोनाको' आणि 'द लॉगेस्ट वीक' या चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांच्या माध्यमातून यशराज एन्टरटेन्मेंटने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.  उदय हा दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा आणि आदित्य चोप्राचा धाकटा भाऊ आहे. राणी मुखर्जी उदयची वहिनी आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, उदयचे क्लिक झालेले Latest Photos.. 
बातम्या आणखी आहेत...