आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रींच्या नव्हे तर सामान्य तरुणींच्या प्रेमात पडले हे 17 अॅक्टर्स, अडकले साताजन्माच्या गाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रेः डावीकड (वर) पत्नी मीरासोबत शाहिद कपूर, (खाली) पत्नी नैनासोबत अभिनेता कुणाल कपूर. उजवीकडे (वर) पत्नी गौरीसोबत अभिनेता शाहरुख खान, (खाली) - पत्नी दिप्तीसोबत अभिनेता श्रेयस तळपदे. - Divya Marathi
छायाचित्रेः डावीकड (वर) पत्नी मीरासोबत शाहिद कपूर, (खाली) पत्नी नैनासोबत अभिनेता कुणाल कपूर. उजवीकडे (वर) पत्नी गौरीसोबत अभिनेता शाहरुख खान, (खाली) - पत्नी दिप्तीसोबत अभिनेता श्रेयस तळपदे.
प्रेम कोणत्याही वयात कुणाशीही होऊ शकते. प्रेमाला अटी किंवा बंधन नाहीये. श्रीमंत असो वा गरीब, सेलिब्रिटी असो सामान्य, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रेमाच्या बाबतीत बॉलिवूडविषयी बोलायचे झाले तर अनेक तरुणी अशा आहेत, ज्यांनी सेलिब्रिटी अभिनेत्यांनी मन जिंकून संसार थाटला. यातील अनेक तरुणींनींचा बॉलिवूडशी दूर-दूरपर्यंत संबंध नाहीये.
अलीकडेच, उदाहरण म्हणजे शाहिद कपूरचे लग्न. एकेकाळी शाहिदचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होते, मात्र त्याने लाइमलाइटपासून दूर, बॉलिवूडशी काहीही संबंध नसलेल्या मीरा राजपूत नावाच्या तरुणीशी त्याने विवाह केला. मीरा मुळची दिल्लीची असून नुकतेच तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शाहिद आणि मीराच्या वयातसुद्धा जवळजवळ 11 वर्षांचे अंतर आहे.
तसे पाहता, बॉलिवूडमध्ये शाहिद हा एकमेव असा अभिनेता नाहीये, ज्याने बॉलिवूडपासून चार हात लांब असलेल्या तरुणीशी विवाह केलाय. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. शाहरुख खान, श्रेयस तळपदेपासून ते फरदीन खान, इमरान हाश्मीपर्यंत अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींशी नव्हे तर ज्यांच्या सिनेसृष्टीशी काहीच संबंध नाही, अशा तरुणींशी साता जन्माची गाठ बांधली आहे.
चला तर मग भेटुया या सेलिब्रिटींच्या पडद्यापासून दूर राहणा-या जोडीदारांना..