आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Who Are Much Older Than You Thought

वयाची चाळीशी ओलांडूनसुध्दा तरुण दिसतात हे स्टार्स, जाणून घ्या यांच्या तारुण्याचे रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक गुलशन ग्रोवर सोमवारी (21 सप्टेंबर) 60 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1955ला दिल्लीमध्ये झाला. गुलशन बॉलिवूडमध्ये हीरो होण्यासाठी आले होते, मात्र नशीबाने त्यांना खलनायक केले.
1980मध्ये 'हम पाच' सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. गुलशन यांनी आतापर्यंत 300पेक्षा जास्त बॉलिवूड सिनेमे केले आहेत. त्यामध्ये 'रॉकी', ‘यस बॉस’, ‘मोहरा’, ‘राम- लखन’, ‘राजा बाबू’ आणि ‘सोहनी-महिवाल’सारखे अनेक हिट सिनेमे सामील आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक भूमिका खलनायाकाच्या केल्या आहेत. आपल्या दमदार खलनायाकाच्या अभिनयामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये 'बॅड मॅन' म्हणून ओळखले जाऊ लागले. 'जंगल बुक' या सिनेमाच्या सीक्वेलमुळे गुलशन यांना इंटरनॅशनल पातळीवरसुध्दा ओळख मिळाली.
गुलशन ग्रोवर 60 वर्षांचे झाले असली तरी त्यांचे तारुण्य आजही टिकून आहे. त्यांना पाहिल्यानंतर वयस्कर असल्याचा जराही अंदाजा आपण लावू शकत नाही. गुलशन याचे श्रेय आपल्या लाइफस्टाइलला देतात, कारण ते प्रत्येक काम वेळेवर करतात. रात्री झोपण्यापासून ते सकाळी लवकर उठण्यापर्यंत, शिवाय ते हेल्दी डाएटसुध्दा घेतात. हेल्दी डाएटलाच ते फिटनेस सीक्रेट मानतात.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये गुलशन यांच्याशिवाय अनेक स्टार्स आहेत, जे 45-50 पार असूनसुध्दा तरुण दिसतात. त्यांचे खरे वय ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही अशाच अभिनेत्यांविषयी...