आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actors Who Refused To Do Intimate Scenes On Screen

सल्लूपासून करीनापर्यंत, स्क्रिनवर सेक्स सीन्स सोडा लिपलॉक करायलाही हे सेलेब्स म्हणतात 'NO'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सलमान खान, करीना कपूर खान, शाहिद कपूर - Divya Marathi
फाइल फोटोः सलमान खान, करीना कपूर खान, शाहिद कपूर

मुंबईः बॉलिवूड सिनेमांमध्ये याकाळात इंटीमेट सीन्स आणि लिप लॉक सीन्सची चलती आहे. अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर असे सीन्स देतात. शाहरुख खान, आमिर खान, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आलिया भट, रणबीर कपूर हे स्टार्स पडद्यावर बिनधास्तपणे बोल्ड सीन्स देतात. मात्र बी टाऊनमध्ये काही स्टार्स असेही आहेत, जे अशा सीन्ससाठी स्पष्टपणे नकार देत असतात. बोल्ड सीन्स तर सोडा लिप लॉक सीन्स द्यायलाही हे स्टार्स तयार होत नाहीत. एक नजर टाकुया अशाच काही स्टार्सवर जे पडद्यावर इंटीमेट सीन्स द्यायला म्हणतात नो....
सलमान खान
सुपरस्टार सलमान खानला इंडस्ट्रीत 27 वर्षे झाली आहेत. त्याने रोमँटिक आणि अॅक्शन धाटणीचे सिनेमे अधिक केले आहेत. मात्र अद्याप कोणत्याच सिनेमासाठी लिपलॉक सीन दिलेला नाहीये. लवकरच सलमान सोनम कपूरसोबत 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात झळकणार आहे.
शाहिद कपूर
करीना कपूरसोबत 'जब वी मेट', प्रियांका चोप्रासोबत 'कमीने' आणि 'हैदर'मध्ये श्रद्धा कपूरसोबत लिप लॉक करणारा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरने लग्नानंतर इंटीमेट सीन्स देण्यास नकार दिला आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूतल हिला तो असे सीन्स करुन नाराज करु इच्छित नाही. म्हणून त्याने आता यापुढे पडद्यावर इंटीमेट सीन्स देणार नसल्याचे ठरवले आहे.
करीना कपूर खान
लग्नापूर्वी करीनाने अनेक अभिनेत्यांसोबत बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले आहेत. मात्र लग्नानंतर तिनेही लिप लॉक सीन्स करणार नसल्याचे ठरवले आहे. लवकरच करीना अर्जुन कपूरसोबत की और का या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अर्जुनसोबत बोल्ड सीन्स देणार नसल्याचे तिने सुरुवातीलाच दिग्दर्शक आर. बाल्कींना स्पष्ट केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी कोणकोणते कलाकार पडद्यावर इंटीमेट होण्यास तयार नाहीत...