आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-मिलिंदसह एकाच वयाचे आहेत हे 9 सेलेब्स, कुणी हिट तर कुणी फ्लॉप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: सलमान खान, मिलिंद सोमण
मुंबई- सलमान खान स्टारर 'प्रेम रतन धन पायो' दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी 40 कोटींची कमाई करून हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्याच वीकेंडमध्ये 129 कोटींची कमाई करून हा सिनेमा वीकेंड कलेक्शनच्या बाबतीतसुध्दा नंबर वन ठरला आहे. या सिनेमात सलमान खानची जोडी सोनम कपूरसोबत जुळली आहे.
27 डिसेंबर 1965मध्ये जन्मलेल्या सलमानने 'मैने प्यार किया' (1989), हम आपके है कौन (1994), हम दिल दे चुके सनम (1999), दबंग (2010), एक था टाइगर (2012), बजरंगी भाईजान (2015)सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तो आजसुध्दा इंडस्ट्रीत आघाडीचा अभिनेता आहे. मात्र त्याच्याच वयाचा मिलिंद सोमण इंडस्ट्रीमधून गायब झाला आहे.
4 नोव्हेंबर 1965ला स्कॉटलँडमध्ये जन्मलेला मिलिंद सोमण 1988मध्ये आलेल्या 'Captain Vyom' टीव्ही सीरिजमधून लाइमलाइटमध्ये आला. त्याने 16 डिसेंबर (2002), रूल्स: प्यार का सुपरहिट फॉर्मूला (2003), जोड़ी ब्रेकर्स (2012)सारख्या सिनेमांत काम केले आहे. मात्र सिनेमांपेक्षा जास्त त्यांला मॉडेलिंगसाठी ओळखले जाते. यावर्षी जुलैमध्ये त्याने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा जिंकली. बातम्यांनुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी' या आगामी सिनेमातसुध्दा तो एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे.
असे म्हटले जाते, की एज इज जस्ट ए नंबर. हे वाक्य बॉलिवूड सेलेब्सना शोभत नाही. वाढत्या वयासोबतच कलाकारांची क्रेजसुध्दा कमी होते. मात्र अनेक एव्हरग्रीन अभिनेते आहेत, ज्यांच्यावर हा फॉर्मूला फिट होत नाही. अनेक असे एव्हरग्रीन स्टार्स आहेत, ज्यांची क्रेज वाढत्या वयासोबत कमी झाली नाहीये. आजसुध्दा बी-टाऊनचे बरेच स्टार्स आहेत, जे वाढत्या वयातसुध्दा सिनेमांत मुख्य भूमिका साकारत आहेत. मा६ त्यांच्याच वयाचे काही कलाकार रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या समवयीन स्टार्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...