आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Alia Bhatt Returned From Alibaug Wearing Sidharth Malhotra T Shirt

सिद्धार्थचे टी-शर्ट घालून SRKच्या पार्टीतून परतली आलिया, यांनी घडवून आणले दोघांचे पॅचअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा - Divya Marathi
आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा
अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची बातमी काही दिवसांपू्र्वीच मीडियात चर्चेत होती. पण अलीकडेच अलिबागमध्ये झालेल्या शाहरुख खानच्या बर्थडे पार्टीत दोघांमधील जवळीक बघून त्यांचे पॅचअप झाल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर शाहरुखच्या पार्टीतून परतत असताना आलियाने चक्क सिद्धार्थचे टी-शर्ट घातले होते. 
 
करण जोहरने मध्यस्थी करुन घडवून आणले दोघांचे पॅचअप... 
आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात पॅचअप घडवून आणण्याचे काम निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. रिपोर्ट्सनुसार, करणने बराच वेळ त्यांच्यासोबत बसून चर्चा केली आणि तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनला आहात, हे दोघांना पटवून दिले. या नात्याला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी करणने दोघांना समजावून सांगितले. करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द ईयर' (2012) या चित्रपटातून आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण काही महिन्यांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे सिद्धार्थनेदेखील एका मुलाखतीत तो सिंगल असल्याचे सांगितले होते. त्यामुळे दोघांच्या ब्रेकअपवर आणखीनच चर्चा रंगली होती. 
 
शाहरुखच्या 52व्या बर्थडे पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आलिया-सिद्धार्थसुद्धा पार्टीत पोहोचले होते.  दोघांमधील जवळीक बघता, आता त्यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पार्टीत सिद्धार्थ ब्लॅक अँड व्हाइट लाइन्सच्या टी-शर्टमध्ये स्पॉट झाला होता. तर दुस-या दिवशी जेव्हा सगळेजण अलिबागहून मुंबईसाठी निघाले, तेव्हा आलिया सिद्धार्थच्या त्याच टी-शर्टमध्ये दिसली.  बातम्यांनुसार हे दोघेही लवकरच मोहित सूरीच्या आगामी 'आशिकी-3' या चित्रपटात झळकणार आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, आलिया-सिद्धार्थचे 3 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...