आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवीला डेट करायची दीपिका, या 6 अभिनेत्रींचेही होते क्रिकेटर्ससोबत Affair

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली त्यांच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असतात. 2013 साली एका शॅम्पूच्या जाहिरातीत काम करत असताना दोघांचे सूत जुळले आणि त्यानंतर हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागले. पण मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. ही चर्चा शमत नाही तोच हे दोघे पुन्हा एकत्र दिसू लागले. हे दोघे आता सिरिअस रिलेशनशिपमध्ये असून आपल्या नात्याचे रुपांतर ते लग्नात करणार असल्याची चर्चा आहे. खरं तर बॉलिवूड आणि क्रिकेटचे कनेक्शन खूप जुने आहे. अनुष्कापूर्वी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे क्रिकेटपटूंसोबत सूत जुळले, पण नंतर ते वेगळे झाले. या पॅकेजमधून जाणून घेऊयात अशाच सात अभिनेत्रींविषयी ज्यांचे एकेकाळी क्रिकेटर्ससोबत अफेअर होते, पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही.  
 
1. दीपिका पदुकोण आणि युवराज सिंह
बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोणचे नाव क्रिकेटर युवराज सिंहसोबत जुळले होते. मीडियात दीपिका-युवराजच्या डेटिंग बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसायचे. पण काही कारणास्तव हे कपल वेगळे झाले. त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरची एन्ट्री झाली. पण नंतर रणबीरपासून ती वेगळी झाली. आता रणवीर सिंहची एन्ट्री तिच्या आयुष्यात झाली असून दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 2007 मध्ये दीपिकाने ओम शांति ओमद्वारे हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. दीपिकाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत 'बचना ऐ हसीनों'(2008), 'रामलीला'(2013), 'चेन्नई एक्स्प्रेस'(2013), 'ये जवानी है दीवानी'(2013), 'तमाशा'(2015), 'पीकू'(2015), 'बाजीराव मस्तानी'(2015), 'ट्रिपल एक्स: द जेंडर ऑफ रिटर्न केज'(2017) या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आता ती 'पद्मावती' या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 
 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या आणखी 6 बॉलिवूड अभिनेत्रींविषयी ज्यांचे क्रिकेटर्ससोबत होते अफेअर... 
बातम्या आणखी आहेत...