आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाला व्हायचे नव्हते अभिनेत्री, बघा B'day गर्लचा दिलखेचक अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. तिने वयाची 31 वर्षे आज पूर्ण केली आहेत.  दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये झाला. 2007मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि खूप कमी वेळेत फिल्म इंडस्ट्रीत तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान प्राप्त केले. ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून 2006मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला.
 
'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', 'पीकू', 'बाजीराव मस्तानी' हे तिचे अलीकडच्या काळातील हिट ठरलेले सिनेमे आहेत. तर आता 'XXX' या सिनेमातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारेय. तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा येत्या 20 जानेवारी रोजी रिलीज होतोय.   
 
व्हायचे नव्हते अभिनेत्री...
दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कार्मेल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. 
 
अनुमप खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये गिरवले धडे...
दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा 2007मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. त्यानंतर दीपिकाने 'ओम शांती ओम' हा सिनेमा साइन केला.

 अनेकांशी जुळले सूत...
दीपिकाच्या खासगी आयुष्यविषयी सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर कपूर, निहार पांड्या, सिध्दार्थ माल्या हे तिच्या लव्ह लिस्टमध्ये सामील आहे. आता रणवीर सिंहसोबत तिचे अफेअर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दोघांना अनेक पार्टीमध्ये एकत्र बघितल्या गेले. रणवीरसोबत आता ती लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे.  
 
दीपिकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय तिचा दिलखेचक ग्लॅमरस अंदाज....  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...