बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 67वा वाढदिवस आहे. बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या जया बच्चन यांनी 1971मध्ये रिलीज झालेल्या 'गुड्डी' या सिनेमाद्वारे
आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. गुड्डी'नंतर त्यांनी एकामागून एक अनेक सिनेमे केले. काही हिट ठरले तर काही फ्लॉप.
या काळात जया यांनी 'उपहार' (1971), 'जवानी दीवानी' (1972), 'बावर्ची' (1972), 'परिचय' (1972), 'कोशिश' (1972) या सिनेमांसह अनेक सिनेमात अभिनय केला. 1972मध्ये आलेल्या 'कोशिश' या सिनेमानंतर ऋषिकेश मुखर्जी जयाचे आवडते दिग्दर्शक बनले. त्यानंतर जया यांनी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'अभिमान' (1973), 'मिली' (1975) आणि 'चुपके चुपके' (1975) या सिनेमात काम केले.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर 80च्या दशकात कौटुंबिक जबाबदा-या सांभाळण्यासाठी जया बच्चन यांनी काम कमी केले. 1981 मध्ये 'सिलसिला' हा सिनेमा केल्यानंतर त्या बॉलिवूडपासून दूर झाल्या. या सिनेमात जया यांच्यासह अमिताभ आणि रेखा झळकले होते. 17 वर्षांनी जया यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि त्यानंतर ब-याच सिनेमात त्यांचे दर्शन घडले.
आज जया बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून जया यांची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच कधी तुमच्या बघण्यात आली असावीत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा जया यांची खास छायाचित्रे...