आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑल टाइम फेव्हरेट काजोलनेही केले आहे भरपूर एक्सपोज, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच बघा!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची ऑल टाइम फेव्हरेट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या काजोलने बुधवारी वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. 5 ऑगस्ट 1972 रोजी जन्मलेल्या काजोलने 'बेखुदी'पासून ते 'माय नेम इज खान'पर्यंत कधीही प्रेक्षकांची निराशा केली नाही. लग्नानंतरसुद्धा काजोलने सिनेसृष्टीत कमबॅक केले आणि आता लवकरच तिला 'दिलवाले' हा सिनेमा रिलीज होणारेय. आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर ती आजही रेसमध्ये कायम आहे.
आपल्या आजवरच्या फिल्मी करिअरमध्ये 6 फिल्मफेअर पुरस्कारांवर तिने आपली मोहर उमटवली आहे. 90 च्या दशकातीली ही आघाडीची अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. काजोलने वयाच्या सोळाव्या वर्षी आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. 1992 साली रिलीज झालेला 'बेखुदी' हा काजोलचा पहिला सिनेमा होता. मात्र काजोलला खरे यश मिळाले ते 1993 साली रिलीज झालेल्या 'बाजीगर' सिनेमामुळे. सिनेमात काजोल अभिनेता शाहरुख खानबरोबर झळकली होती. शाहरुख आणि काजोलच्या जोडीला रुपेरी पडद्यावरील हिट जोडी समजली जाते. 1997 साली रिलीज झालेल्या 'गुप्त' आणि 1998च्या 'दुश्मन' सिनेमातील भूमिकेसाठी काजोलचे कौतुक झाले होते.
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात काजोलनेही भरपूर एक्सपोज केले आहे. एक नजर टाकुया काजोलच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही खास छायाचित्रांवर. या छायाचित्रांमध्ये काजोल एक्सपोज करताना दिसत आहे...
बातम्या आणखी आहेत...