आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखा पाहू : ही चिमुकली आहे बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री, आज आहे 32 वा B\'day

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणा-या या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? काय म्हणता नाही... चला तर मग आम्ही तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो. ही चिमुकली आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री झाली असून तिचे सलमान खान आणि रणबीर कपूरसारख्या मोठ्या स्टार्ससोबत नाव जुळले आहे... बरोबर, आम्ही बोलतोय ते बी टाऊनची ग्लॅमडॉल कतरिना कैफविषयी...
आज कतरिनाचा वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. 2003 मध्ये 'बूम' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या कतरिनाला फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.
कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 मध्ये हाँगकाँग येथे झाला. कतरिनाने बॉलिवूडमध्ये जितके अभिनयातून नाव कमावले तितकीच ती तिच्या अफेअर्समुळेसुध्दा चर्चेत राहिली. तिचे खरे नाव कतरिना कैफ नसून कतरिना टॉरकेटी (Katrina Thorquette) आहे. कतरिनाचे बालपण हवाई (hwaii) मध्ये गेले. तिने आपल्या आयुष्याची काही वर्षे 18 विविध देशांमध्ये घालवली. कतरिनाला सात बहिणी आहेत. तीन लहान तर तीन मोठ्या बहिणी आहेत. काश्मिरी वडील आणि ब्रिटीश आईची मुलगी असलेली कतरिना बालपणीपासून खट्याळ स्वभावाची आहे. बालपणीसुद्धा ती आज एवढीच सुंदर दिसायची.
या ग्लॅमडॉलच्या वाढिवसाचे औचित्य साधत आम्ही तिच्या बालपणीच्या छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे. तिची ही छायाचित्रे क्वचितच तिच्या चाहत्यांच्या बघण्यात आली असावीत.
चला तर मग तुम्हीही बघा, बालपणी किती क्युट दिसायची कतरिना...
(नोटः इंटरनेटवरील विविध माध्यमांतून ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत.)