आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप सीननंतर प्रचंड बिथरली होती ही अॅक्ट्रेस, व्हिलनला म्‍हणाली होती- हात लावू नकोस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंजीत आणि माधुरी दीक्षित. - Divya Marathi
रंजीत आणि माधुरी दीक्षित.
धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला 80च्‍या दशकातील माधुरीशी संबंधित एक अत्‍यंत चर्चित असा किस्‍सा सांगणार आहोत. तेव्‍हा माधुरी फिल्म इंडस्‍ट्रीमध्‍ये नवीनच होती.‍ तिचे मोजकेच सिनेमे रिलिज झाले होते. तेव्‍हा माधुरीला 'प्रेम प्रतिज्ञा' नावाचा सिनेमा ऑफर झाला होता. सिनेमात तिचा हिरो होता मिथून चक्रवर्ती आणि व्हिलन होता रंजीत. या सिनेमात एक रेप सीन होता. हा सीन केल्‍यानंतर रंजीत यांचा माधुरीला असा धसका बसला की, तिने सरळ रंजीत यांना सांगितले होते की, मला हात लावू नकोस. तसे तर सिनेमात रेप सीन असणार आहे, याची माधुरीला पूर्वीच कल्‍पना देण्‍यात आली होती आणि माधुरीही यासाठी तयार होती. मात्र सीननंतर ती प्रचंड बिथरली होती.  

सीन शूट होण्‍यापूर्वी माधूरीच्‍या मनात होती धाकधुक 
80 च्‍या दशकात रंजीत हे सर्वाधिक लोकप्रिय असे व्हिलन होते. फिल्‍म 'प्रेम प्रतिज्ञा' मध्‍ये एक रेप सीन असणार होता, जो माधुरी आणि रंजीत यांच्‍यामध्‍ये शूट केला जाणार होता. माधुरीही या सीनसाठी पूर्ण तयार होती. मात्र शूटिंगपूर्वी या सीनमुळे माझा प्रचंड गोंधळ उडाला होता, असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले आहे. माधुरी सांगते की, 'रेपसीनबद्दल माझ्या मनात खूप प्रश्‍न निर्माण झाले होते. रेप सीन कसा शूट होईल, या प्रश्‍नामुळे मी प्रचंड गोंधळली होती.' 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या सिनेमाशी संबंधित आणखी काही माहिती... 
 
 


 
बातम्या आणखी आहेत...