आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actress Neha Sharma Father Is Congress Mla From Bihar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षण सुरु असताना मिळाली सिनेमाची ऑफर, काँग्रेस आमदाराची मुलगी आहे ही अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर : मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, शत्रुघ्न सिन्हा, शेखर सुमनसह अनेक स्टार्सनी हे बिहारच्या छोट्याशा शहरांतून बाहेर पडून बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या स्टार्सच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये राहणा-या या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव आहे नेहा शर्मा. नेहाने साउथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.
भागलपूर शहरात झाला जन्म
भागपूर शहरात जन्मलेली नेहा नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. 26 वर्षांच्या नेहाने दिल्लीच्या एनआयएफटी कॉलेजमधून फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण घेतले. नेहाचे वडील काँग्रेसचे आमदार आहेत.
भागलपूरच्या शाळेतून घेतले शिक्षण
नेहाने शालेय शिक्षण भागलपूराच्या माऊंट कारमेल शाळेतून पूर्ण केले. नवी दिल्लीच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नीलॉजी कॉलेजमधून फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतले. काही दिवस फॅशन डिझाइनर म्हणून काम केल्यानंतर नेहाने तेलगु सिनेमामधून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.
तेलगु सिनेमातून केले पदार्पण
नेहाने 'चिरुथ' या तेलगु सिनेमातून पदार्पण केले. 2007मध्ये आलेल्या या सिनेमाचे अश्विनी दत्तने दिग्दर्शन केले होते. नेहासोबत चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजानेसुध्दा या सिनेमातून पदार्पण केले होते. परंतु सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. नेहाचा 'चिरुथ' हा तेलगु सिनेमा अपयशी राहिला मात्र त्याची भरपूर चर्चा झाली. त्याकारणाने महेश भट्ट यांनी तिला 'क्रूक'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली चर्चा केली होती.
वडिलांसाठी केला होता प्रचार
बिहारमधून विधानसभा निवडणूक लढत असलेले वडील अजीत शर्मा यांच्यासाठी नेहाने भोगलपूरा येथे प्रचार केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून नेहा शर्माची काही ग्लॅमरस छायाचित्रे...