आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड अॅक्ट्रेसने 4 वर्षांत चाहत्यांना आपल्या हॉट अदांनी बनवले वेडे, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राला गुरुवारी (10 डिसेंबर) बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन चार वर्षे झाली आहेत. त्यामुळे ती खूप उत्साहित आहे. हा आनंद तिने ट्विट करुन व्यक्त केला आहे.
परिणीतीने बुधवारी ट्विट केले होते, ''So tomorrow I complete 4 years in the industry. 4 of the most special years of my life! Watch this space for something exciting ... :)''
10 डिसेंबर 2011 रोजी परिणीतीचा 'लेडीज वर्सेस रिकी बहल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात तिने रणवीर सिंहसोबत स्क्रिन स्पेस शेअर केली होती. त्यानंतर 'इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'हंसी तो फंसी', 'दावत-ए-इश्क', 'गुलरेज', 'किल दिल' हे तिचे सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
परिणीती मुळची अंबाला (हरियाणा) ची असून 22 ऑक्टोबर 1988 रोजी तिचा जन्म झाला. परिणीती 2009 साली आर्थिक मंदीमुळे परदेशातून भारतात परतली आणि यशराज फिल्म्समध्ये पीआर म्हणून कामाला लागली. येथेच तिला बॉलिवूड सिनेमाची ऑफर मिळाली आणि ती या क्षेत्राकडे वळली. परिणीती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची सख्खी चुलत बहीण आहे.
या चार वर्षांत वेगवेगळ्या फोटोशूट्सच्या माध्यमांतून परिणीतीचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तिचा हाच अंदाज दाखवतोय...
बातम्या आणखी आहेत...