आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळ्या रंगामुळे प्रियांकावर व्हायची टिका, लोक म्हणायचे \'काली-कलूटी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- प्रियांका चोप्रा)
मुंबई- आज अभिनेत्री प्रियांका चोप्रा 33 वर्षांची झाली आहे. 18 जुलै 1982 रोजी तिचा जन्म जमशेदपूर, बिहार येथे झाला. तिचे दिवंगत वडील आकाश चोप्रा आणि मधु चोप्रा आर्मीचे फिजिशिअन होते. पालकांच्या नोकरीमुळे प्रियांकाचे बालपण जमशेदपूरशिवाय दिल्ली, पुणे, लखनऊ, बरेली, लद्दाख, चंडीगढ आणि अंबाला येथे गेले. यावेळी तिने लखनऊ (ला मार्टिनिअर गर्ल्स स्कूल) आणि बरेली (सेंट मारिया गोरेट्टी कॉलेज)मधून तिने शिक्षण घेतले. वयाच्या 13व्या वर्षी ती शिक्षणासाठी यूनायटेड स्टेटला निघून गेली. तीन वर्षांनी परत आलेल्यानंतर आर्मी स्कूलमधून हायस्कूलची परिक्षा दिली. 2000मध्ये प्रियांकाने मिस इंडिया पेजेंटमध्ये सहभाग घेतला आणि किताब जिंकला. याचवर्षी तिला भारताकडून मिस वर्ल्ड पेजेंटमध्ये पाठवण्यात आले होते आणि हा ताजदेखील तिने आपल्या डोक्यावर सजवला.
2000मध्ये रिलीज झाला पहिला बॉलिवूड सिनेमा-
प्रियांका चोप्राने 2002मध्ये सनी देओल आणि प्रिती झिंटा स्टारर 'द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी दिग्दर्शक अब्बास मस्तानी यांच्या 'हमराज' सिनेमाची तिला ऑफर मिळाली होती. परंतु काही कारणास्तव तिने सिनेमास नकार दिला. स्क्रिन डेब्यूविषयी बोलायचे झाले तर 'Thamizhan' या तामिळ सिनेमातून तिने पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले होते. 'द हिरो...'नंतर प्रियांकाने 'अंदाज' (2003), 'मुझसे शादी करोगी' (2004), 'वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम' (2005), 'डॉन' (2006), 'फॅशन' (2008), 'कमीने' (2009), 'डॉन 2' (2011), 'अग्निपथ' (2012), 'बर्फी' (2012), 'क्रिश 3' (2013), 'गुंडे' (2014), 'मेरी कोम' (2014) आणि 'दिल धडकने दो' (2015)सारख्या सिनेमांत काम केले. तिचे दोन सिनेमे 'बाजीराव मस्तानी' आणि 'गंगाजल 2' यावर्षी रिलीज होऊ शकतात. 2008मध्ये दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'फॅशन' सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

सावळ्या रंगाने होत होती टिका-
प्रियांकाला बालपणी सर्वजण 'काली-कलूटी' म्हणून चिडवत होते. परंतु आज तीच सावळी तरुणी जगाल आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. बालपणी प्रियांका खूप सावळी होती म्हणून तिला सर्वजण चिडवत होते. आज तिची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. तिला आपल्या आई-वडिलांचा पाठिंबा मिळाला नसता तर ते ती आज इंडस्ट्रीमध्ये येऊच शकली नसती.
टॉयलेटमध्ये बसून खात होती चिप्स-
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा अर्थातच पीसी 13 वर्षांची असताना बोस्टनला शिक्षण घेण्यासाठी गेली होती. या अनुभवाविषयी प्रियांका सांगते, 'वयाच्या जवळपास 13व्या वर्षी यूएसमध्ये जाणे माझ्यासाठी एक कल्चर शॉक होता. मी कधीच कॅफेटेरियामध्ये जात नव्हते. कारण मला माहित नव्हते, की रांगेत कसे उभे राहिले जाते आणि पैसे कसे भरले जातात. वाढलेले जेवण कसे खावे हेदेखील मला माहित नव्हते. मला स्वत: मुर्ख ठरवून घ्यायचे नव्हते. म्हणून मी वेडिंग मशीनवरून चिप्स खरेदी करत होते आणि बाथरुममध्ये जाऊन खात होते. मी तेथे माझे तीन वर्षे असेच घालवले.'
आईच्या एका निर्णयाने बदलले आयुष्य-
पीसी जेव्हा परदेशातून परतली तेव्हा तिची काकू तिला 'काली कलूटी' म्हणून चिडवत होती. कोणत्याही सामान्य मुलांप्रमाणे प्रियांकाचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला होता. दुसरीकडे तिचे वडील तिला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी करत होते. त्यावेळीच प्रियांकाच्या आईने असे पाऊल उचलले, ज्यामुळे तिचे आयुष्यच बदलले. प्रियांकाने ज्या विद्यापाठीमध्ये शिक्षण घेण्यासाठी तिने पासपोर्स साइज फोटो काढला होता, तोच फोटो तिच्या आईने मिस इंडिया स्पर्धेत पाठवला. तिच्या आईने याविषयी कुणालाच काही सांगितले नव्हते.
एकेदिवशी त्या स्पर्धेसाठी प्रियांकाची निवड झाल्याचा फोन आला आणि तेव्हा सर्वांना काय घडले ते कळाले. प्रियांकाने स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. त्याचवर्षी प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर ती सिनेमांकडे वळाली. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तिला काही वर्षातच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रियांकाने 'मेरी कॉम', 'बर्फी', 'फॅशन', डॉन सीरीज, 'कमीने', 'ऐतराज'सारख्या सिनेमांत काम केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांका चोप्राची निवडक छायाचित्रे...