एन्टरटेन्मेंट डेस्कः राधिका
आपटे आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. 2005 मध्ये 'वाह लाइफ हो तो ऐसी' या सिनेमात छोटेखानी भूमिकेद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी राधिका आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या राधिकाने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. अलीकडेच म्हणजे 21 ऑगस्ट रोजी राधिकाची प्रमुख भूमिका असलेला 'मांझी : द माउंटेन मॅन' हा सिनेमा रिलीज झाला. राधिकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला राधिकाचे खासगी आयुष्य आणि फिल्मी करिअरविषयी सांगत आहे.
पुण्यात जन्मलेल्या मराठमोळ्या राधिकाचे बालपण आणि शिक्षण याच शहरात झाले आहे. 2005 मध्ये 'वाह! लाइफ हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राधिकाने सहा वेगवेगळ्या भाषांत 33 सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या बोल्ड अंदाजाने राधिकाने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी इमेज तयार केली आहे. इतकेच नाही, तर अनेक वादांतही तिचे नाव अडकले आहे.
पुणे शहराशी नाते...
7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या राधिकाने येथील फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे. ती पुण्याचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारुदत्त आपटे यांची मुलगी आहे. तिचे आईवडील याच शहरात वास्तव्याला आहेत. राधिका सुटीच्या काळात नेहमी पुण्यात येत असते. बालपणीपासूनच तिला अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुण्यातील आसक्त या मराठी नाट्यसंस्थेत एन्ट्री घेतली. पूर्ण विराम, मात्र-रात्र आणि कन्यादान या मराठी नाटकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या. 'अंतहीन' या बंगाली सिनेमा राधिकाने वृंदा नावाचे पात्र साकारले होते. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, राधिकाविषयीच्या माहित नसलेल्या खास गोष्टी...