आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS : चोप्रा कुटुंबात कुणीतरी येणार गं! राणी मुखर्जी होणारेय आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका वेबसाइटने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, राणी मुखर्जी लवकरच आई होणारेय. प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत गेल्यावर्षी लगीनगाठीत अडकल्यानंतर राणी मुखर्जी इंडस्ट्रीतून काहीशी गायब झाली आहे.
राणी सध्या लंडनमध्ये असून तिथे काही चाचण्यांनंतर ही बातमी आल्याचे बोलले जाते. 21 एप्रिल 2014 रोजी मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत राणी आदित्य चोप्राशी विवाहबद्ध झाली होती. राणीचे ब्लॅक, युवा, हम-तुम, नो वन किल्ड जेसिका, मर्दानीसारख्या चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या होत्या.
राणी आदित्यची दुसरी पत्नी आहे. पायल खन्नासोबत आदित्यचे पहिले लग्न झाले होते. मात्र 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.