आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Reena Roy Undergoes Weight Loss Operation

Fat to Fit : एक काळ गाजवणा-या रीना रॉय करतायेत कमबॅक, वर्षभरात कमी केले 25 किलो वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय लवकरच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. मात्र यावेळी त्यांनी मोठ्या नव्हे तर छोट्या पडद्याची निवड केली आहे. सोनी वाहिनीवरील आगामी 'रानी महल' या मालिकेत त्या झळकणार आहेत. त्यांची मालिकेतील भूमिका एका राजमातेची असून त्याला ग्रे शेड आहे. तब्बल 15 वर्षांनंतर त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी त्या 2000 मध्ये शेवटच्या वेळी 'रेफ्युजी' या सिनेमात झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र आता कमबॅकसाठी त्या सज्ज झाल्या आहेत. एवढ्या वर्षांत त्यांचे वजन खूप वाढले होते. मात्र कमबॅकसाठी त्यांनी गेल्या वर्षभरात आपले तब्बल 25 किलो वजन कमी केले आहे. बातमी आहे, की यासाठी त्यांनी बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अति लठ्ठ व्यक्तींना वजन कमी करण्यास मदत मिळते.
या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी केली जाते. स्थूल शरीरामुळे अनेक व्याधी जडण्याची भिती असते. मधुमेह, अतितणाव तसेच झोपेचे विकार अशा अनेक त्रासाचे मूळ हे वाढलेले वजन असते. त्यामुळे रीना रॉय यांनी ही सर्जरी करुन घेतली. मध्यंतरीच्या काळात त्यांचे वजन बरेच वाढले होते.
रीना यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या फिट बॉडी आणि वजनासाठी कॉन्शियस आहेत. येथे अनेक अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी वजन कमी केले आहे. या अभिनेत्री आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहेत.
बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय?
बेरियाट्रिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी केली जाते. या तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. यामध्ये लॅप बँड, स्लीव गॅस्ट्रिकटॉमी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरीचा समावेश आहे. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे पोटाचा आकार कमी करणे. यामुळे रुग्णाची भूक कमी होती. परिणामी भविष्यकाळात त्याचे वजन कमी होण्यास मदत होते. लॅप्रोस्कोपिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात येते. या सर्जरीच्या माध्यमातून दीड ते दोन वर्षांत 60-65 टक्के वजन कमी केले जाते. यासाठी साधारणतः दोन ते तीन लाखांचा खर्च येतो.
एक नजर टाकुया अशाच काही अभिनेत्रींवर, ज्यांनी ग्लॅमरस लूकसाठी वजन कमी केले...