आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड अॅक्ट्रेसने मुंबईत खरेदी केले ड्रीम होम, पहिल्यांदाच बघा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋचा चड्‌ढाने तीन महिन्यांपूर्वीच मुंबईतील वर्सोवा येथे नवीन घर खरेदी केले आहे. - Divya Marathi
ऋचा चड्‌ढाने तीन महिन्यांपूर्वीच मुंबईतील वर्सोवा येथे नवीन घर खरेदी केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्‌ढाने तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील वर्सोवा परिसरात स्वतःचे घर खरेदी केले आहे. येथे ती तिचा भाऊ प्रणवसोबत वास्तव्याला आहे.  divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचितमध्ये ऋचाने तिच्या या ड्रीम होमविषयी सांगितले. ऋचा म्हणाली, 'तीन महिन्यांपूर्वी मी या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. घराला मी खास पर्सनल टच दिला आहे. एखाद्या इंटेरिअर डिझायनरने घर डिझाइन केले आहे, असे न वाटता, घरी आल्यावर हे माझे घर आहे आणि ते मी स्वतः सजवले आहे, असा फिल मला हवा होता. त्यामुळे मी स्वतः घर सजवले आहे.'

वास्तू शास्त्रावर आहे ऋचाचा विश्वास...
ऋचाने सांगितले, 'माझा वास्तू शास्त्रावर विश्वास आहे. लवकरच वास्तू शास्त्रानुसार मी घराची पूजा करणार आहे. माझ्या वडिलांचा या संदर्भातला अभ्यास आहे. ते मुंबईत येण्याची मी प्रतिक्षा करत आहे. ते आल्यानंतर आम्ही पूजा करणार आहोत. मला शूटिंगपासून ज्या दिवशी सुटी असेल, त्या दिवशी मी स्वतः स्वयंपाक करत असते. विशेषतः रविवारी मीच स्वयंपाक करते. त्यादिवशी मी माझ्या घरी स्वयंपाक करणा-या मुलीला सुटी देत असते. किचनमध्ये सगळ्यात पहिले नाश्ता तयार होतो आणि त्यानंतर हेल्दी जेवण बनवते."

ऋचाच्या घरी एक पाळीव मांजर आहे. तिच्याविषयी ती सांगते, 'माझ्या मांजरीचे नाव कमली आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात माझ्या मित्र शाहिद आमिर अंकोलकरच्या घरुन मी तिला आणले होते. त्याच्या घरी एक मांजर आहे, तिला पिल्ले झाल्यानंतर मी त्यापैकी एकाला घरी आणले. माझ्या मते, सगळ्यांनी पेट अॅडॉप्ट करायला हवे. पेटाचा उपक्रम डोण्ट शॉप अर्थातच प्राण्यांची खरेदी न करता त्यांना अॅडॉप्ट करा, यावर माझा विश्वास आहे.' 

ऋचाने सांगितले, 'मला निर्सग खूप आवडतो. घर खरेदी करताना मी अशा ठिकाणाची निवड केली, जिथे भरपूर हिरवीगार झाडे आहेत. माझ्या घराच्या खिडकीतून उगवणारा सूर्य दिसतो. शिवाय सूर्यप्रकाश घरात येतो. मला लहानलहान गोष्टी आवडतात. मी जिथे जिथे जाते, तेथून मिनीएचर कलेक्ट करते. मोरक्को, जापान, इटली, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, चायना या ठिकाणांहून मी अनेक सजावटीच्या गोष्टी आणल्या आहेत. शिवाय राजस्थान, पंजाब, गोवा  येथूनही अनेक वस्तू खरेदी केल्या आहेत.' 

पुढील स्लाईड्सवर बघा, ऋचा चड्ढाच्या ड्रीम होमचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...