आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे कतरिना कैफ, आजही राहते भाड्याच्या घरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः येत्या 16 जुलै रोजी कतरिना कैफचा वाढदिवस असून ती वयाची 34 वर्षे पूर्ण करणार आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला 'जग्गा जासूस' हा सिनेमा शुक्रवारी (14 जुलै) रिलीज झाला असून या सिनेमात रणबीर कपूरसोबत तिने स्क्रिन शेअर केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते. 2003 पासून फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या कतरिनाजवळ अद्याप भारतात स्वतःचे घर नाही. ती आजही भाड्याच्या घरात वास्तव्याला आहे. 
 
कोट्यवधींची मालकिण आहे कतरिना...
कतरिना दीर्घ काळापासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर (लॉयराल, स्लिक, लक्स, नक्षता) आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिनाची कमाई होते. रिपोर्ट्सनुसार, कतरिनाकडे सुमारे 64 कोटींची संपत्ती आहे. लग्झरी कारची शौकिन असलेल्या कतरिनाजवळ  Audi Q3, Audi Q7 आणि SUV या आलिशान गाड्या आहेत. 
 
15 लाख रु. भाडे भरायची कतरिना...
सुरुवातीच्या काळात कतरिना वांद्र्याच्या गुलदेव सागर अपार्टमेंटमध्ये वास्तव्याल होती. 2014 साली ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत कार्टर रोड स्थित सिल्वर सेंड अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहात होती. पण 2016 साली दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर काही काळ कतरिना त्याच घरात राहात होती. या घराचे सुमारे 15 लाख रुपये प्रति महिना भाडे होते.  आता मात्र कतरिना वांद्रास्थित माऊंट मेरी चर्चजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे. सुत्रांनुसार, कतरिनाचे काही दिवसांपूर्वीच मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे, पण तिने अद्याप त्याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

केवळ कतरिनाच नव्हे तर बॉलिवूड सिनेमांमधून कोट्यवधींची कमाई करणा-या आणखी काही अभिनेत्री मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...