आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Urvashi Rautela Spent 1 Crore For Jewellery And Saree In Cousin Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उर्वशीच्या या साडीची किंमत ऐकून तुम्ही जाल चक्रावून, 28 लाखांचे घातले दागिने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अलीकडेच डेहरादून येथे तिच्या चुलत भावाच्या लग्नात सहभागी झाली होती. भावाच्या लग्नात उर्वशी पारंपरिक रुपात दिसली. तिने गोल्डन कलरची भरजरी साडी परिधान केली होती. सोबत हेवी दागिने तिने घातले होते. उर्वशीने नेसलेल्या या साडीची किंमत किती असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता का... तिच्या या साडीची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. तब्बल 55 लाखांची साडी उर्वशीने परिधान केली होती. इतकेच नाही तर तिने घातलेले दागिने हे तब्बल 28 लाखांचे आहेत. 


40 किलोंची आहे ही साडी... 
उर्वशीची ही साडी हेवी वेट आहे.या साडीचे वजन 40 किलो आहे. एवढ्या मोठ्या वजनाची ही साडी तयार करण्यासाठी सात महिने लागले. साडीला गोल्डन जरी लावण्यात आली आहे. तर तिचे दागिने फराह अली खान यांनी डिझाइन केले.

 

या चित्रपटांमध्ये केलंय उर्वशीने काम...
उर्वशी रौतेलाने 2013 साली 'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ती 'भाग जॉनी' (2015), 'सनम रे' (2016), 'ग्रेट ग्रँड मस्ती' (2016), 'काबिल' (2017) या चित्रपटांमध्ये झळकली. 'हेट स्टोरी 4' आणि 'रेस 3' हे तिचे आगामी चित्रपट असून 2018 मध्ये रिलीज होणार आहेत. अद्याप एकही सोलो हिट चित्रपट उर्वशीच्या नावी नाही. 


पुढील स्लाईड्सवर बघा, भरजरी साडी आणि दागिन्यात नटलेल्या उर्वशीचे हे खास PHOTOS..  

बातम्या आणखी आहेत...