आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनला डेंग्यूची लागण, इमारतीच्या गच्चीवर सापडल्या अळ्या, विश्रांतीचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन हिला डेंग्यूची लागण झाली आहे. आगामी सिनेमा ‘कहानी 2’च्या शूटिंग करुन ती नुकतीच अमेरिकेतून परतली आहे. भारतात आल्यानंंतर विद्याला डेंग्यू झाल्याचे समजले. डॉक्टरांनी तिला 10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

विद्या जुहू येथील ‍तिच्या निवासस्थानी उपचार घेत आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तिच्या घराची पाहाणी केली. ती राहत असेलल्या इमारतीच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. त्या नष्ट केल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, अभिनेता अनिल कपूर आणि जुही चावला यांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होता. त्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीसही बजावली होती.

दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2012 मध्ये डेंग्यू झाला होता. उपचार सुरु असताना त्यांंचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, विद्या बालनच्या मादक अदा...
बातम्या आणखी आहेत...