आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Who Got Married To Businessmen

हे आहेत आएशा टाकियाचे पती, या अभिनेत्रींनीसुद्धा बिझनेसमनसोबत बांधली लगीनगाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: पती फरहान आझमीसोबत आएशा टाकिया)
मुंबईः सलमान खान स्टारर सुपरहिट 'वाँटेड' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री आएशा टाकिया आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 10 एप्रिल 1986 रोजी मुंबईत चेंबुर येथे आएशाचा जन्म झाला. वयाच्या 15 व्या वर्षी तिने मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. कॉम्प्लॅनच्या जाहिरातील आएशा शाहिद कपूरसोबत झळकली होती. कॉम्प्लॅनची ती जाहिरात 'आए अॅम ए कॉम्प्लॅन गर्ल' या नावाने आजही प्रसिद्ध आहे. त्यानंतर आएशा गायिका फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उड उड जाए' या गाण्यात झळकली होती.
'टार्जन द वंडर कार' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेणा-या आएशाचे फिल्मी करिअर खास राहिले नाही. 'सोचा न था' आणि 'वाँटेड' हे निवडक हिट सिनेमे तिच्या नावी आहेत.
2009 मध्ये बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन फरहान आझमीसोबत आएशा विवाहबद्ध झाली. आएशाचे मुस्लिम पद्धतीने लग्न झाले. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान एक उद्योगपती असून त्याचे अनेक रेस्तराँ आहेत.
तसे पाहता बिझनेसमनसोबत विवाहबद्ध झालेली आएशा एकमेव अभिनेत्री नाहीये. येथे अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनेत्यासोबत नव्हे तर बिझनेसमनसोबत लग्न करुन संसार थाटला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये आम्ही तुम्हाला बिझनेसमनसोबत विवाहबद्ध झालेल्या अभिनेत्रींविषयी सांगत आहोत...