आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Who Got Pregnant Before Marriage

लग्नाआधीच गरोदर राहिली होती श्रीदेवी, या अभिनेत्रीसुध्दा लग्नआधी होत्या प्रेग्नेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुली - जान्हवी आणि खुशीसोबत अभिनेत्री श्रीदेवी - Divya Marathi
मुली - जान्हवी आणि खुशीसोबत अभिनेत्री श्रीदेवी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी कपूर आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी श्रीदेवी प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांची पत्नी आहे. श्रीदेवी बोनी यांची दुसरी पत्नी आहे. बोनी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन श्रीदेवीशी दुसरा संसार थाटला होता. पहिल्या पत्नीपासून बोनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर श्रीदेवी आणि बोनी यांनाही दोन मुली आहेत. जान्हवी हे त्यांच्या थोरल्या तर खुशी हे धाकट्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी लग्नाआधीच गरोदर राहिली होती.
खरे पाहता अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नसीबद्दल कुणाला कळू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र श्रीदेवीने कधीही ही गोष्ट लपवून ठेवली नाही. श्रीदेवीने ती सात महिन्यांची गरोदर असताना बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केले होते. 1996 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.
बॉलिवूडमध्ये लग्न करण्यापूर्वी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. बहूधा अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नेंसीच्या गोष्टी लपवून गुपचुप लग्नगाठीत अडकतात. त्यासाठी त्या अनेक कारणे देतात, मात्र सत्य काही वेगळेच असते. श्रीदेवीप्रमाणेच कोकणा सेन आणि सारिका हासनसह अनेक जणी लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्या होत्या.
एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर...