आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'Day: या अॅक्ट्रेसवर आहे सलमानच्या बहिणीचा संसार मोडल्याचा आरोप, प्रेक्षकांना देत असते चॅलेंज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिने तिचा नवरा पुलकित सम्राटपासून विभक्त झाली आहे. याला बॉलिवूडमधली ही सुंदर अभिनेत्री जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री यामी गौतम हिच्याविषयी. यामीचा आज वाढदिवस असून तिने वयाची 28 वर्षे पूर्ण केली आहेत. लवकरच यामी अभिनेता हृतिक रोशनसोबत 'काबिल' या सिनेमात झळकणारेय.
वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात यामीच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्याविषयी... सोबतच श्वेता-पुलकितवरुन निर्माण झालेल्या वादाविषयी...
खासगी आयुष्य
यामीचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमालच प्रदेशातील बिलासपूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर थोरली बहीण सुरिली गौतम हीदेखील पंजाबी सिनेमांमधील अभिनेत्री असून प्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांची सून आहे. दिवंगत जसपाल भट्टी यांचा मुलगा जसराज सिंग भट्टीसोबत 2013 मध्ये सुरिली विवाहबद्ध झाली. बालपणी यामीची आएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र वयाच्या 20 व्या वर्षी तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी यामीने लॉचे शिक्षण अर्धवट सोडले. आता ती मुंबईत पार्ट टाइममध्ये आपल्या ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. तिला इंटेरिअल डेकोरेशन, वाचन आणि संगीताची आवड आहे.
यामीचे करिअर
यामीने दुरदर्शनवरील 'चाँद के पार चलो' या मालिकेद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती 'राजकुमार आर्यन' आणि 'ये प्यार ना होगा कम' या मालिकांमध्ये झळकली. 'विकी डोनर' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात ती अभिनेता आयुष्मान खुराणासोबत झळकली होती. या सिनेमासाठी अनेक पुरस्कार तिने आपल्या नावी केले. हिंदीच नव्हे तर तामिळ, तेलगू, पंजाबी, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'टोटल सियप्पा', 'अॅक्शन जॅक्सन', 'बदलापूर' हे तिचे रिलीज झालेले बॉलिवूड सिनेमे आहेत. तर 'सनम रे' आणि 'जूनूनियत' या सिनेमांत तिने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली.
जाहिरातींमधील प्रसिद्ध चेहरा
हळूहळू यामी जाहिरात क्षेत्रातीलदेखील प्रसिद्ध चेहरा बनली आहे. फेअर अँड लव्हलीची तिची जाहिरात चांगलीच गाजत आहे. या जाहिरातीत ती प्रेक्षकांना उत्पादकाविषयी चॅलेंज देताना दिसत असते. याशिवाय कॉर्निटो, सॅमसंग मोबाइल आणि शेवरोले या ब्रॅण्ड्ससाठीही ती जाहिरात करते.
पुलकितसोबत जुळले नाव
दिव्या खोसला दिग्दर्शित 'सनम रे' या आगामी सिनेमात यामी पुलकित सम्राटसोबत झळकणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान यामी आणि गौतमचे सूत जुळल्याचे म्हटले जात आहे. खरं तर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुलकितचे सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत लग्न झाले होते. स्वतः सलमानने श्वेताचे कन्यादान केले होते. मात्र लवकरच त्यांचा संसार मोडकळीस आला. याला जबाबदार यामी असल्याचे म्हटले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा 'सनम रे' साठी यामी आणि पुलकित यांच्यावर किसींग सीन चित्रीत झाले, तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक वाढली. हे दोघे बराच वेळ एकत्र घालवताना दिसले. शिवाय पुलकित फावल्या वेळेत यामीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तिच्यासोबत क्वॉलिटी वेळ घालवायचा. इतकेच नाही तर सेटवर दोघे एकत्रच जेवायचे. आता या बातमीत किती तथ्य आहे हे तर माहित नाही, मात्र पुलकितसोबत नाव जुळल्याने यामी चांगलीच वादात अडकली हे खरे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, यामीची लक्ष वेधून घेणारी झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...