आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मात्यांवर संतापली अॅक्ट्रेस, म्हणाली, पूर्वकल्पना नसताना द्यावे लागले लांब Kissing Scenes

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता सलमान खानसोबत 'वीर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री जरीन खानचा 'अक्सर 2' हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात अपयशी ठरला आहे. चित्रपटाची तिकीटबारीवर सपशेल निराशा झाली आहे. पण यासोबतच जरीन आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. अलीकडेच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जरीन खानने 'अक्सर 2' या चित्रपटाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. शिवाय भविष्यात चित्रपटाचा निर्माता वरुण बजाजसोबत काम करणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. 

 

>> निर्मात्यांनी तोकडे कपडे घालण्यास पाडले भाग...
'अक्सर 2' या चित्रपटाची रिलीजच डेट तीनदा लांबवणीवर पडली होती. अखेर 17 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा अनेकदा लांबणीवर पडल्याचे जरीनने या मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली, "निर्माते मला वारंवार कपडे बदलायला सांगत असे. विनाकारण निर्माते मला प्रत्येक फ्रेमसाठी अतिशय छोटे कपडे परिधान करायला सांगायचे. त्यामुळे माझ्या स्टायलिस्टला वारंवार कपडे चेंज करावे लागायचे." इतकेच नाही तर जेव्हा निर्माते तिच्याकडे या चित्रपटाची ऑफर घेऊन गेले होते, तेव्हा त्यांनी तिला सांगितले होते, की त्यांना 'हेट स्टोरी 3' सारखा नव्हे तर एक क्लीन आणि कौटुंबिक धाटणीचा चित्रपट बनवायचा आहे. पण नंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. 


>> पुर्वकल्पना नसताना द्यावे लागले  लांब किसींग सीन...
जरीनने या मुलाखतीत सांगितले, की तिला पुर्वकल्पना न देता चित्रपटात लांब किसींग सीन टाकण्यात आले. जरीन म्हणाली, "सेंशुअस सीन चित्रीत करण्याच्या नावावर निर्मात्यांनी माझ्याकडून अशा काही गोष्टी करुन घेतल्या ज्यांना केवळ अश्लील म्हणता येईळ. इतकेच नाही तर मला चित्रपटाच्या प्रायव्हेट स्क्रिनिंगलासुद्धा आमंत्रित करण्यात आले नाही." 


पुढे वाचा, 'अक्सर 2'च्या प्रमोशनदरम्यान जरीनचा झाला विनयभंग, त्यावेळी निर्माते घेत होते बिअरचा घोट... 

बातम्या आणखी आहेत...