आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण खेरपासून ते शाहिदच्या आईपर्यंत, या 6 बॉलिवूड अभिनेत्रींनी दोनदा थाटला संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण खेर, नीलिमा आजमी - Divya Marathi
किरण खेर, नीलिमा आजमी
थिएटर, बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री किरण खेर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 62 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 जून, 1955 रोजी पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला. किरण यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंबीय चंदीगडला शिफ्ट झाले होते. येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. आज त्या चंदीगडच्या लोकसभा खासदार आहेत. दोनदा लग्न थाटणा-या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये किरण यांची गणना होते. किरण यांचे पहिले लग्न मुंबईतील बिझनेसमन गौतम बेरी यांच्यासोबत झाले होते. काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. किरण यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा असून सिकंदर हे त्याचे नाव आहे. पहिले लग्न मोडल्यानतंर 1985 साली त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला स्वतःचे नाव दिले. सिकंदर खेर हादेखील बॉलिवूड अभिनेता आहे.

पंजाबी सिनेमांमधून केली करिअरची सुरुवात..  
किरण खेर यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1983 साली 'आसरा प्यार दा' या पंजाबी सिनेमाद्वारे केली होती. त्यांनर 1996 साली अमरीश पुरी यांच्यासोबत त्यांनी  'सरदारी बेगम' (1997) या सिनेमात काम केले. हा सिनेमासुद्धा बराच गाजला होता. किरण यांनी 2002 साली आलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'देवदास' (2002)  या सिनेमाद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका गाजल्या. त्यांनी  हिंदीत 'मैं हूं ना' (2004), 'हम तुम' (2004), 'वीर जारा' (2004), 'मंगल पांडेः द राइजिंग' (2005), 'रंग दे बसंती' (2006), 'फना' (2006) सह अनेक सिनेमे केले आहेत.

नीलिमा आजमी
अभिनेत्री नीलिमा आजमी यांचे पहिले लग्न 1975 साली अभिनेता पंकज कपूर यांच्यासोबत झाले होते. दोघांचा एक मुलगा असून शाहिद कपूर हे त्याचे नाव आहे. नीलिमा आणि पंकज यांनी  1984 साली घटस्फोट घेतला. त्यानंतर नीलिमा यांनी 1990 साली अभिनेता राजेश खट्टरसोबत लग्न केले. दुस-या लग्नापासूनसुद्धा नीलिमा यांना एक मुलगा असून त्याचे नाव ईशान खट्टर आहे. ईशान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नीलिमा आणि राजेश यांचादेखील 2001 साली घटस्फोट झाला. नीलिमा यांनी 'सलीम लगडे पर मत रो' (1990), 'आजा रे ओ साजन' (1994), 'छोटा सा घर' (1996), 'इतिहास' (1997), 'इश्क-विश्क' (2003) सह बरेच सिनेमे केले आहेत. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींनी पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर थाटला दुसरा संसार... 
बातम्या आणखी आहेत...