Home »Gossip» Bollywood Actresses Own Costliest Bags, Kareena Kapoor To Sonam Kapoor

तुम्हाला ठाऊक आहे या 7 बॉलिवूड अॅक्ट्रेसेसच्या हॅण्डबॅग्सची किंमत, आकडा ऐकून व्हाल अवाक्!

दिव्य मराठी वेब टीम | Aug 12, 2017, 17:06 PM IST

  • करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण
काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहर दीड लाखांची बॅग घेऊन पोहचला होता. पण, तुम्हाला माहितीये का, याहीपेक्षाही महागड्या बॅग्स बॉलिवूड अभिनेत्री कॅरी करतात. आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रींकडे अनेक ब्रॅण्ड्सच्या महागड्या बॅग आहेत. यामध्ये कोणाकडे आठ लाखांची तर कोणाकडे चार लाखांची बॅग असल्याचे दिसते.

करीना कपूर खानजवळ आहे 8 लाखांची बॅग..
शॉपिंगची शौकीन असणा-या करीना कपूर खान हिच्याकडे अनेक ब्रॅण्ड्सच्या महागड्या हॅण्डबॅग्स आहेत. चॅनेल, बॉटटेगा, गॅवेन्ची या ब्रॅण्ड्सच्या बॅग्स ती वापरते. तिच्याकडे असलेल्या हर्म्स बर्किन एप्सॉम ब्रॅण्डच्या बॅगची किंमत तब्बल 8.26 लाख इतकी आहे.
करीना आणि दीपिकाची आवड आहे सारखी...
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिलासुद्धा करीनाप्रमाणेच हर्म्स बर्किन एप्सॉम ब्रॅण्डच्या बॅग्स आवडतात. तिच्याजवळ असलेल्या बॅगची किंमतसुद्धा 8.26 लाख इतकी आहे. याशिवाय तिच्याकडे गुसी आणि चॅनल या ब्रॅण्ड्सच्या बॅग्स आहेत.
पुढे वाचा, अनुष्का, सोनम कपूर आणि इतर अभिनेत्री कोणत्या ब्रॅण्डच्या बॅग्स वापरतात...

Next Article

Recommended