आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलपासून ते दीपिकापर्यंत, वाढत्या वयात आणखीच बहरत चाललंय या 16 अॅक्ट्रेसेसचे सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री काजोल हिचा आज  वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 ऑगस्ट 1974 रोजी मुखर्जी कुटुंबात काजोलचा जन्म झाला. या कुटुंबाच्या अनेक पिढ्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. तर आई तनुजा समर्थ या एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. मुखर्जी कुटुंबाच्या तीन तर समर्थ कुटुंबाच्या चार पिढ्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.
 
काजोलचे लग्न बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणसोबत झाले आहे. अजयचे फॅमिली मेंबर्स आणि नातेवाईक फिल्म इंडस्ट्रीशी जुळले आहेत. त्याचे वडील वीरू देवगण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर तर आई वीणा देवगण या सिने निर्मात्या आहेत. त्याचे धाकटे भाऊ अनिल देवगण हे असिस्टंट डायरेक्टर आहेत. 

काजोलने 1992 साली 'बेखुदी' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. 1993 साली रिलीज झालेल्या 'बाजीगर' या सिनेमामुळे ती एका रात्रातून स्टार झाली. दोन मुलांची आई असलेली काजोल आजही ग्लॅमरस दिसते. बॉलिवूड आणि अॅड वर्ल्डमध्ये ती कार्यरत आहे. खरं तर काळानुरुप व्यक्तीच्या लूकमध्ये बदल होतो. वाढत्या वयाचा परिणामसुद्धा चेह-यावर दिसू लागतो. मात्र काजोल याला अपवाद आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. वाढत्या वयात काजोल अजूनच सुंदर दिसतेय. 

काजोलच नव्हे तर करीना, दीपिका आणि शिल्पा शेट्टीसह बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या वयाच्या तिशी-चाळिशीनंतर आणखीनच सुंदर दिसतात.  एक नजर टाकुया या अभिनेत्रींच्या लूकवर... 
 
बातम्या आणखी आहेत...