आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशा दिसतात राखी, बदलला प्रसिद्ध अॅक्ट्रेसेसचा LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार अलीकडेच मुंबईत त्यांची मुलगी मेघना गुलजारच्या आगामी 'तलवार' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होत्या. राखी ब-याच काळापासून त्यांच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्याला आहेत. अनेक वर्षांनी त्या मुलीच्या आग्रहाखातर दीड महिन्यांपूर्वी मुंबईत आल्या. स्वतः मेघना गुलजार यांनी divyamarathi.com सोबत केलेल्या बातचितमध्ये ही गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले, ''मम्मा तशी पनवेलच्या फार्महाऊसमध्ये राहते, मात्र दीड महिन्यांपासून ती मुंबईत आहे. थिएटर आणि महोत्सवांसाठी मला माझ्या सिनेमाच्या फायनल प्रिंट्स तयार करायच्या आहेत. शिवाय प्रमोशनसाठी प्रवास करायचा आहे. त्यामुळे मम्मीला म्हटले, की मुंबईत येऊन मुलगा समयचा सांभाळ कर. पॅरेंट्स सोबत असल्याने आमच्यासारख्या वर्किंग मदरला मुलांची काळजी राहात नाही.''
मेघना यांनी सांगितले, की आई सतत कामात बिझी असल्याने मी माझे बालपण मिस केले आहे. त्या म्हणतात, ''जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा आईचे करिअर यशोशिखरावर होते. ती सतत कामात व्यस्त होती. त्यामुळे बालपणी कुठे ना कुठे मी तिला मिस केले आहे. आता तोच काळ ती मुलगा समयसोबत एन्जॉय करतेय. दिवसभर तो आईकडे असतो, त्यानंतर संध्याकाळी पापांच्या (गुलजार) घरी खेळायला जातो. या मोहमायेत माझा मुलगा माझ्या आईला परत घेऊन आलाय, असे म्हणता येईल.''
आता राखी कायमच्या मुंबईतच राहतील का? असा प्रश्न मेघना यांना विचारला असता, त्या म्हणाल्या, ''ठाऊक नाही. यापूर्वी अधूनमधून त्या आम्हाला भेटायला मुंबईत येत असे. मात्र अधिकवेळा आम्हीच पनवेलला जायचो. पुन्हा मी नवीन सिनेमावर काम सुरु केल्यानंतर आई मला पाठिंबा द्यायला नक्की येईल.''
वयाच्या 20 व्या वर्षी राखी यांनी केले होते पदार्पण
15 ऑगस्ट 1947 रोजी जन्मलेल्या राखी यांनी वयाच्या 20 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1967 मध्ये आलेल्या 'बधू बरण' या बंगाली सिनेमातून त्यांनी पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री घेतली होती. त्यानंतर जवळजवळ तीन वर्षांनी म्हणजे 1970 मध्ये त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज झाला होता. त्या सिनेमाचे नाव होते 'जीवन मृत्यू'. धर्मेंद्र या सिनेमात त्यांचे को-अॅक्टर होते.
2009 पर्यंत सिनेसृष्टीत होत्या कार्यरत
राखी यांनी 1967 ते 2009 या काळात बॉलिवूड सिनेमांमध्ये कामे केलीत. या काळात त्यांनी लीडिंग अॅक्ट्रेसपासून ते आईपर्यंतच्या वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. 'शर्मिली' (1971), 'दाग' (1973), 'कसमें वादे' (1978), 'शान' (1980), 'लावारिस' (1981), 'राम लखन' (1989), 'करन अर्जुन' (1995), 'एक रिश्ता : द बॉन्ड ऑफ लाइफ' (2001) आणि 'दिल का रिश्ता'( 2003) यांसह अनेक गाजलेल्या सिनेमांत त्यांनी अभिनय केला. 2009 मध्ये रिलीज झालेला क्लासमेट हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे.
लूकमध्ये झाला बराच बदल
राखी यांची गतकाळातील आणि आत्ताची छायाचित्रे बघितली असता, काळानुसार त्यांच्यात खूप बदल झाल्याचे दिसून येईल. 60-70 च्या दशकातील या आघाडीच्या अभिनेत्रीला आता सहजासहजी ओळखता येत नाही. केवळ राखीच नव्हे तर गतकाळातील अनेक अभिनेत्री आता वेगळ्या दिसू लागल्या आहेत.
divyamarathi.com वाचकांना अशाच काही अभिनेत्रींची छायाचित्रे दाखवत आहे. क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...