आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा, मीनाक्षीसह इतक्या बदलल्या 90sच्या या ग्लॅमरस अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीषा कोइराला
बॉलिवूडच्या जून्या ट्रेंडला तोडून महिला बॉडीगार्डला हायर करणारी अभिनेत्री मनीषा कोइराला आपल्या नवीन निर्णयामुळे चर्चेत आली आहे. 45 वर्षांच्या मनीषाने वयाच्या 21व्या वर्षी सुभाष घईच्या 'सौदागर' सिनेमातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले. तिने 90च्या दशकात प्रेक्षकांची मने जिंकून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
बॉलिवूडमध्ये गाजला 'खामोशी'
1994मध्ये मनीषाला विदु विनोद चोप्राच्या '1942 ए लव्ह स्टोरी' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात मनीषाने आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. या सिनेमासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा फेअर अवॉर्ड मिळाला होता. बॉम्बे, अकेले हम अकेले तुम, गुप्त, अग्निसाक्षी आणि खामोशीसारख्या सिनेमांसाठीसुध्दा मनीषाने प्रशंसा मिळवली आहे.
दारू पिण्याच्या सवयीने आणि चुकीचे सिनेमे निवडल्यामुळे मनीषा सिनेमांपासून दूर झाली. तिला कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर मनीषा पुन्हा एकदा चर्चेत आली. मात्र मनीषाने या आजारावर मात करून पुन्हा करिअरला सुरुवात करत आहे.
मागील 25 वर्षांत मनीषाच्या सौंदर्यात अनेक बदल झाले आहेत, परंतु मनीषा एकमेव अशी अभिनेत्री नाहीये. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्यात काळानुसार बदल झाला आहे. या पॅकेजच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किती बदलल्या 90'sच्या अभिनेत्री...