आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Who Hooked Up With Foreigners

या 6 अॅक्ट्रेसेसचे जुळले होते परदेशी तरुणांसोबत सूत, मात्र अधुरी राहिली प्रेमकहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फाइल फोटो : कंगना रनोट निकोलस लेफार्टीसोबत (डावीकडे) आणि नीना गुप्ता विवियन रिचर्ड्ससोबत]
एन्टरटेन्मेंट डेस्कः एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अॅक्ट्रेस नीना गुप्ता यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियात खूप चर्चिल्या गेल्या होत्या. ही गोष्ट ऐंशीच्या दशकातील आहे, जेव्हा वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सकॅरेबियाई टीमसोबत भारत भेटीवर आले होते. याच काळात एका फंक्शनमध्ये त्यांची भेट नीना गुप्ता यांच्यासोबत झाली. दोघांची ही भेट लवकरच प्रेमात बदलली. विवियन नीना यांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले की आपण विवाहित असल्याचेही ते विसरुन गेले होते. याच काळात नीना प्रेग्नेंट राहिल्या. नीना यांनी विवियन यांच्याशी लग्न न करताच मुलगी मसाबाला जन्म दिला. मसाबा फॅशन वर्ल्डमधील प्रसिद्ध नाव असून ती आपल्या आईचेच आडनाव लावते. नीना यांनी 2008 मध्ये विवेक मेहरासोबत लग्न केले आहे.
कोण आहेत नीना गुप्ता
4 जुलै 1959 मध्ये नवी दिल्लीत जन्मलेल्या नीना गुप्ता फिल्म आणि टीव्ही अॅक्ट्रेस आहेत. 'ये नजदीकियां' (1982), 'मंडी' (1983), 'उत्सव' (1984), 'डॅडी' (1989), 'खलनायक' (1993), 'तेरे संग' (2009) आणि 'वीर' (2010) यांसह ब-याच सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. याशिवाय 'दाने अनार के' (2002), 'कितनी मुहब्बत है' (2009) आणि 'दिल से दिया वचन' (2010-2011) या मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत.
तसे पाहता, परदेशी तरुणाच्या प्रेमात पडलेल्या नीना गुप्ता बी टाऊनमधील एकमेव अभिनेत्री नाहीयेत. ही लिस्ट बरीच मोठी आहे. काही जणी अशा आहेत, ज्यांनी परदेशी तरुणांसोबत लग्न थाटून परदेशात स्थायिक होणे पसंत केले. तर काही जणी अशा आहेत, ज्यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली.
एक नजर टाकुया अशाच काही अभिनेत्रींवर...
कंगना रनोटः इंग्लिश डॉक्टर निकोलस लाफेर्टीसोबत राहिले अफेअर
'क्वीन' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमांद्वारे आपली अभिनय क्षमता सिद्ध करणारी अभिनेत्री कंगना रनोटचे अफेअर इंग्लिश डॉक्टर निकोलस लाफेर्टीसोबत बरेच दिवस चालले होते. स्वतः कंगनाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र 2012 मध्ये दोघांचे नाते संपुष्टात आले. मात्र हे नाते का तुटले, हे आजही उघड झालेले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही अशाच अभिनेत्रींविषयी...