आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Who Star Carrier From Modelling

मुग्धा, अनुष्का, दीपिका, मॉडेलपासून अभिनेत्री बनले हे 8 सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे)
मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसेने नुकतेच 29वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 26 जुलै 1986 रोजी महाराष्ट्रमध्ये झाला. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुग्धाने स्वत: खर्च स्वत: करण्यासाठी छोटे-मोठे काम केले आणि आज या पायरीवर स्थापित आहे. तिने मॉडेलिंगपासून बॉलिवूड करिअरपर्यंतचा प्रवास स्व:बळावर केला.
सेल्सगर्लपासून मॉडेलिंग-
मुग्धाने मॉडेलिंगपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास गाठला. यादरम्यान मुग्धाला 2002मध्ये आपल्या पहिले यश ग्लॅडरेग्स मेगा मॉडेल हंट जिकून मिळाले. या हंटनंतर मुग्धा लाइमलाइटमध्ये आली. तिने 2002मध्ये बेस्ट मॉडेल आणि मिस इंडियामध्ये बेस्ट नॅशनल कॉस्ट्युमचा किताब नावी केला. 2004मध्ये मुग्धा फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सेमी फायनालिस्टसुध्दा ठरली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये शिफ्ट झाली.

बॉलिवूडचे करिअर-
'खतरो के खिलाडी सीजन-5'मध्ये भयंकर स्टंट करणारी मुग्धा कधीकाळी शाहरुख खानसोबत एका जाहिरातीत दिसली होती. मुग्धाने बॉलिवू़डमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पाच वर्षे टेलिव्हिजन जाहिरातीत काम केले होते. तिने शाहरुखसोबत एअरटेल जाहिरातीत काम केले. त्यासोबतच क्लोजअप आणि अनेक जाहिरात मुग्धा झळकली. यादरम्यान तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केला. मुग्धाने 2008मध्ये मधुर भंडारकर यांच्या 'फॅशन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2009मध्ये मुग्धाला 'फॅशन'साठी फिल्मफेअर उत्कृष्ट फिमेल डेब्यू आणि स्टार स्क्रिन पुरस्कारामध्ये उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. 'फॅशन'साठी तिला 2009मध्ये अप्सरा उत्कृष्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला.
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिग करताना त्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अशा स्टार्सविषयी जे मॉडेलिंगपासून अभिनेत्री बनल्या...