आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An Exciting Peek Into Sunny Leone’s Apartment In Mumbai And Few Pics Of Her Home Outside India:

Photos मध्ये पाहा सनी लिओनच्या मुंबई आणि परदेशातील घराची खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनीच्या परदेशातील घरातील ग्लॅमरस लिव्हिंग रुम. सनीसोबत तिचा नवरा डेनियल दिसतोय. - Divya Marathi
सनीच्या परदेशातील घरातील ग्लॅमरस लिव्हिंग रुम. सनीसोबत तिचा नवरा डेनियल दिसतोय.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन काही महिन्यांपूर्वी तिच्या घरामुळे चर्चेत आली होती. मुंबईत आल्यानंतर सनीने अभिनेत्री सेलिना जेटली हिचे मुंबईतील घर भाड्याने घेतले होते. मात्र अस्वच्छतेमुळे सेलिनाने सनी आणि तिच्या नव-याला घर रिकामे करायला सांगितले होते. अद्याप सनीचे मुंबईत स्वतःचे घर नाहीये. सेलिनाचे घर रिकामे केल्यानंतर तिने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पतीसोबत मुक्काम ठोकला होता. मात्र आता तिला पुन्हा एकदा मुंबईतच भाड्याचे घर मिळाले आहे. एक अपार्टमेंट तिने भाड्याचे घेतले असल्याचे समजते. यावर्षीची दिवाळीसुद्धा तिने याच घरात साजरी केली. 
 
मुंबईत जरी सनीकडे स्वतःचे घर नसले तरी जर्मनीत तिचे घर आहे. सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर गर्भश्रीमंत असल्याचे सा-यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे भाड्याचे घर असो वा परदेशातील स्वतःचे नक्कीच आलिशान असणार, हे नक्की. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सनीच्या मुंबई आणि जर्मनीतील घरांची खास झलक घेऊन आलो आहोत. 
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कसा आहे सनीचा आशियाना...