आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिता, दीपिका, काजोलसह या बॉलिवूड अभिनेत्री आहेत \'डक्सी ब्यूटी\', पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री स्मिता पाटील आणि दीपिका पदुकोण)
हिंदी सिनेसृष्टीत जेव्हा कधी आर्ट कलाकारांविषयी बोलले जाते, तेव्हा स्मिता पाटीलसारख्या अभिनेत्रीचे नाव सर्वात पहिले घेतले जाते. तिचे करिअर खूप लहान होते, मात्र यात तिने अनेक शानदार सिनेमे दिले. जवळपास 14 सिनेमे तिच्या मृत्यूनंतर रिलीज झाले होते. आज स्मिता पाटीलचा स्मृतीदिवस आहे. स्मिताचा डक्सी लूक कधीच तिच्या करिअरच्या मध्ये आला नाही. स्मिताच नव्हे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचा लूक डक्सी असूनदेखील त्या सुपरहिट ठरल्या.
13 डिसेंबर 1986ला वयाच्या 31व्या वर्षी स्मिताने जगाचा निरोप घेतला. फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पदवी शिक्षण घेतल्यानंतर स्मितावर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची नजर पडली आणि त्यांनी स्मिताला 'चरणदास चोर'साठी साइन केले. स्मिता 1975पासून 1985पर्यंत जवळपास 10 वर्षांत हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेला चेहरा बनली. काही वर्षांच्या करिअरमध्ये तिने 'मंथन', 'भूमिका', 'आक्रोश', 'बाजार', 'नमक हलाल', 'अर्थ', 'मंडी', 'मिर्च मसाला'सारखे अविस्मरणीय सिनेमे दिले.
स्मिताची गणती अशाच अभिनेत्रींमध्ये होते, ज्यांचा लूक डक्सी असूनदेखील त्या सुपरहिट ठरल्या. या अभिनेत्रींना जराही भिती नव्हती, की आपल्या सावळ्या रंगामुळे सिनेमातून आपल्याला रिजेक्ट केले जाईल. या लूकसह त्यांनी सुपरहिट सिनेमांत काम केले आणि एक वेगळी ओळख निर्माण केली.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांचा डक्सी लूक असूनदेखील त्या सुपरहिट आहेत...
दीपिका पदुकोण-
दीपिकीने डक्सी लूक असूनदेखील बॉलिवूडमध्ये कमी काळातच यश मिळवले. तिने 'ओम शांती ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने 'कॉकटेल', 'गोलियों की रासलीला रामलीला', 'हॅप्पी न्यू इअर', 'पीकू', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'ये जवानी है दीवानी'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केले. अलीकडेच फोर्ब्सने 100 भारतीय सेलिब्रिटींच्या यादी सादर केली आहे. त्यात अभिनेत्रींच्या यादीत दीपिका सर्वाधिक कमाई करणारी पहिल्या क्रमांकाची अभिनेत्री ठरली आहे. दीपिकाची वर्षाची कमाई आहे 59 कोटी. दीपिकाचे यावर्षी 'पीकू' आणि 'तमाशा' हे दोन सिनेमे रिलीज झालेत आणि आणखी एक 'बाजीराव मस्तानी' 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडच्या डस्की ब्यूटीजविषयी...
बातम्या आणखी आहेत...