आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Who Got Married Before Becoming Famous

शाहरुख-आमिरच नव्हे, या सेलेब्सनेही Famous होण्यापूर्वीच थाटला होता संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: शाहरुख खान, गौरी खान, आमिर खान, रीना दत्ता
मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान 50 वर्षांचा झाला आहे. 2 नोव्हेंबर 1965ला जन्मलेला शाहरुखच्या यशाचे श्रेय काहीप्रमाणात त्याची पत्नी गौरीला जाते. शाहरुख खान बी-टाऊनचा असा अभिनेता आहे, ज्याने लोकप्रियता मिळवण्यापूर्वी लग्न केले होते. अलीकडेच लग्नाचा 24वा वाढदिवस साजरा करणारे शाहरुख आणि गौरीजची लव्ह-स्टोरी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये. वेगळ्या धर्माचे असूनदेखील शाहरुख आणि गौरीने केवळ एकमेकांना स्वीकारले. आज ही जोडी बॉलिवूडमधील यशस्वी जोडी आहे.
पहिल्या नजरेत झालेले प्रेम आणि त्यासाठी कुटुंबीयांच्या विरोधात जाणा-या शाहरुखने गौरीसोबत 1991मध्ये लग्न केले. त्याचा 'दीवाना' हा पहिला सिनेमा लग्नाच्या एका वर्षानंतर अर्थातच 1992मध्ये रिलीज झाला. मात्र यापूर्वी शाहरुख टीव्हीवर प्रसारित होणा-या 'फौजी' मालिकेत काम करत होता. बी-टाऊनमध्ये अनेक सेलेब्स आहेत, जे प्रसिध्द होण्यापूर्वीच विवाहित होते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच जोड्यांमा भेटवत आहोत.
आमिर खान आणि रीना दत्त-
आमिरने दोनवेळा लग्न केले आहे. सध्या त्याची पत्नी किरण राव आहे. आमिरच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्त आहे. रीना आमिरच्या शेजारी राहत होती. दोघांना प्रेम झाले आणि त्यांना लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र वेगळ्या धर्माचे असल्याने आमिर-रीना यांना घरातून पळून जाऊन लग्न करावे लागले होते. 18 एप्रिल 1986मध्ये त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र 16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002मध्ये आमिरने रीनासोबत घटस्फोट घेतला आणि डिसेंबर 2005मध्ये किरण रावसोबत लग्न केले. रीना आणि आमिर यांना दोन मुले (मुलगा जुनैद आणि मुलगी इरा) आहेत. दोघेबी रीनाकडेच राहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रसिध्दी मिळवण्यापूर्वीच लग्न करणा-या सेलेब्सविषयी...